0
चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर यूट्यूबचा १८% प्रभाव

मुंबई - बाॅलीवूड सुपरस्टार शाहरुख खान नुकताच यूट्यूबच्या एका व्हिडिअाेत भुवन बामसाेबत दिसला. भुवनच्या चॅनलचे १ काेटी १६ लाख सबस्क्रायबर अाहेत. शाहरुखच्या या व्हिडिअाेस अातापर्यंत १ काेटी ३७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले अाहेत. अाता माेठ्या चित्रपटतारकांनी प्रसिद्धीसाठी यूट्यूब स्टार्सची मदत घेणे सुरू केले अाहे. विशेष म्हणजे यूट्यूबच्या नायकांना हाॅलीवूडमध्ये प्रमाेशनासाठी बाेलावले जात अाहे. यूट्यूब चॅनल कॅरीमिनातीचे अजय नागर यांना हाॅलीवूड चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल-६’ च्या प्रमोशन इव्हेंटसाठी पॅरिसमध्ये बाेलावण्यात अाले. यूट्यूबवर आशिष चंचलानी यांनाही ‘अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’च्या प्रमोशन इव्हेंटसाठी बाेलावले गेले.

यूट्यूबने चित्रपटाच्या प्रचारात टीव्हीलाही मागे साेडले अाहे. यामुळे अाता असे प्रमोशन हाेऊ लागले अाहे. ऑरमॅक्स मीडियाच्या अहवालानुसार कोणत्याही चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या उत्पन्नापैकी ४० टक्के रक्कम यूट्यूब व फेसबुकवरून केलेल्या प्रचारामुळे मिळते. त्यात यूट्यूबचा वाटा १८ टक्के अाहे. यूट्यूबवर सबस्क्रिप्शन व व्यूजसंदर्भात माेठे चित्रपटाच्या बॅनरच्या चॅनलच्या तुलनेत वेगाने पुढे जात अाहे. ‘दिव्य मराठी’शी बाेलताना यूट्यूबवर अाशिष चंचलानी म्हणतात की,लाेकप्रियता वाढते. त्यांच्यामुळे अामची विश्वसनीयता वाढते. प्रेक्षक अाम्हाला अधिक गंभीरतेने घेतात. यादरम्यान अामच्यावर चांगली स्क्रिप्ट लिहिण्याचा दबाव खूप असताे. ही स्क्रिप्ट मार्केटिंग टीमकडे जाते. त्यावर कलाकाराकडून मान्यता घ्यावी लागते. अक्षयकुमारने अामच्या स्क्रिप्टमध्ये बदल केला हाेता. त्याने अनेक चांगले संवाद त्यात जाेडले हाेते.

यूट्यूबवर भुवन बाम यांना विचारण्यात अाले की, प्रमोशनल व्हिडिअाेला व्हायरल बनवण्यासाठी किती दबाव असताे? तेव्हा ते म्हणाले, एकदा ब्रँड टीमच्या व्यक्तीने अाम्हाला सांगितले की, अाम्हाला व्हायर कंटेट बनवायचा अाहे. त्यावर मी म्हणालाे की, तुमच्याकडे पैसा असल्याने तुम्ही ते व्हायरल करणार. मी फक्त चांगला कंटेट बनवू शकताे.

यूट्यूबर्स फिल्मी बॅनरच्या चॅनलच्या पुढे
अनेक माेठे बॅनर्स यूट्यूब चॅनलवर अाहे. त्यावर रिलीज होणाऱ्या ट्रेलर्सला काेट्यवधी व्ह्यूज मिळतात. परंतु नवीन युवा यूट्यूबर्स वेगाने नवीन सबस्क्राइब मिळवतात हेही दिसून अाले अाहे. टी-सिरीज चॅनलचा मागील एका महिन्याच्या सबस्क्रिप्शन रेट १९ टक्के हाेता. यशराज फिल्म्सचा सबस्क्रिप्शन ग्रोथ रेट २३.६ व धर्मा प्राॅडक्शनचा ३४ टक्के हाेता. दुसरीकडे इंडिव्हिज्युअल यूट्यूबर्स बीबीची वाइन्सचा ग्रोथ रेट ४४.२ टक्के हाेता. तसेच मोस्टलीसेनचा ग्रोथ रेट ४१.७ टक्के अाहे. कॉमेडियन जाकीर खानच्या चॅनलचा सबस्क्रिप्शन ग्रोथ रेट २०.८२ टक्के अाहे. सोशलब्लेड अॅनालिटिक्स चॅनल्सची सबस्क्रायबर रँकसुद्धा देते. त्यात रेड चिलीज एंटरटेन्मेंटची रँक १२७४ अाहे. भुवन बामची २३९, आशिष चंचलानीची ३८१ रँक अाहे. अनेक बॅनर्सचे व्ह्यूज व सबस्क्रिप्शन नवीन ट्रेलर आल्यावर वाढते. परंतु यूट्यूबर्स या प्रकरणात सतत वाढत अाहे.


या यूट्यूबर्सकडे येत अाहेत दिग्गज
यूट्यूबचा परिणाम वाढत चालला...
ऑर्मेक्स मीडियाच्या अहवाल प्रसिद्ध केला अाहे. त्यात म्हटले, चित्रपटाला अनुकूल वातावरण देणाऱ्या फेसबुक व यूट्यूबचा वाटा माेठा अाहे. पहिल्या दिवसाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम हाेताे.

21% फेसबुक + इन्स्टाग्राम
18% यूट्यूब
13% टीव्ही

आशिष चंचलानी
चॅनल- आशिष चंचलानी वाइन्स
दोन व्हिडियोजवर व्ह्यू- ३.१ काेटी

चॅनल सब्सक्राइबर्स- ९१ लाख

चॅनलवर अक्षयकुमार व शाहिद कपूर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अाले . अक्षयने 'गोल्ड'चे प्रमोशन केले हाेते. शाहिदने 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटाचे प्रमोशन केले हाेते.

सर्वात जास्त स्टार्स एआयबीवर | एआयबी सब्सक्राइबर्स - ३४ लाख
यूट्यूब चॅनल एआयबीवर सर्वात जास्त चित्रपट स्टार दिसतात. त्यात शाहरुख खान, रणबीर कपूर, कंगना राणावत, आलिया भट्टसारखे स्टार्स अाहेत. हे स्टार पॉडकास्ट (चॅट शो), स्किटमध्ये दिसतात.

अपील पॉवर
15% यूट्यूब
12% फेसबुक
9% टीव्ही
7% ट्विटर

चॅनल- जाकीर खान
व्हिडिअाेवर व्ह्यू- २६ लाख
चॅनल सबस्क्रायबर- ३२ लाख
स्टँडअप कॉमेडियन जाकीर खानच्या यूट्यूब चॅनलवर इरफान खानने 'करीब-करीब सिंगल' चित्रपटाचे प्रमोशन केले हाेते. चॅट शो फॉरमॅटच्या या व्हिडिअाेत जाकीरने अमेझन प्राइमच्या शोचे प्रमोशन केले हाेते.

प्राजक्ता कोली
चॅनल- मोस्टलीसेन
३ व्हिडिअाेवर व्ह्यू- ८५ लाख
चॅनल सबस्क्रायबर- ३० लाख
प्राजक्ताच्या चॅनलवर सैफ अली खानने 'बाजार' हा चित्रपट तर काजोलने 'हेलिकॉप्टर ईला' या चित्रपटाचे प्रमोशन केले हाेते. आयुष्मान खुराणानेही 'अंदाधुंद'चे प्रमोशन केले अाहे.
Youtube is most popular than tv

Post a Comment

 
Top