0
तुमचे पचनतंत्र मजबूत नसेल तर तुम्हाला दुध पचत नाही. आयुर्वेदामध्ये दुध पिण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांच

दुध आपल्या आहारातील एक प्रमुख हिस्सा आहे. हे आपल्या शरीर आणि बुद्धीला आवश्यक पोषण प्रदान करते. हे थंड, वात आणि पित्त दोषाला संतुलित करण्याचे काम करते. आयुर्वेदानुसार गायीचे दुध सर्वात पौष्टिक असते. दुध, भूक शांत करते आणि लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देते. परंतु काही लोकांना दुध प्यायल्यानंतर पचत नाही. त्यांना पोट फुगण्याची किंवा वारंवार खराब होण्याची समस्या निर्माण होते. मागील काळातील तुलनेत आजच्या दुधाची गुणवत्ता कमी झाल्यामुळे असे घडते. जर तुमचे पचनतंत्र मजबूत नसेल तर तुम्हाला दुध पचत नाही. आयुर्वेदामध्ये दुध पिण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास दुध पचेल आणि आरोग्यास लाभ होईल.


साखर न मिसळेले दुध
सामान्यतः लोक दुधात साखर टाकून ते दुध पितात. आयुर्वेदानुसार रात्री साखर न टाकता दुध पिणे अधिक फायदेशीर राहील. शक्य असल्यास दुधामध्ये गायीचे एक किंवा दोन चमचे तूप टाकू शकता.


ताजे आणि जैविक दुध
सध्याच्या काळात आपली जीवनशैली अशी आहे की, आपण प्रत्येक वस्तू पॅकिंगमधील वापरतो. अनेक लोक पॅकिंगमधील दुध वापरतात. पॅकिंगमधील दुध ताजे नसते आणि जैविकही नसते. आयुर्वेदानुसार ताजे, जैविक आणि रासायनिक प्रक्रिया न केलेले दुध उत्तम असते. पॅकिंगमधील दुधाचे सेवन करू नये.


उकळलेले दुध
काही लोकांना कच्चे दुध पिणे आवडते. फ्रीजमधून दुध काढून न उकळता तसेच पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. आयुर्वेदानुसार दुध उकळून, गरम असताना प्यावे. दुध पिताना जड वाटत असेल तर त्यामध्ये थोडेस पाणी मिसळू शकता. हे दुध सहजपणे पचते.


देशी गायीचे दुध
आयुर्वेद गायीच्या दुधाचे सेवन करण्यावर जास्त भर देते. आयुर्वेदानुसार देशी गायीचे दुधच सर्वात जास्त आरोग्यदायी फायदे देण्यात समर्थ आहे. शहरामध्ये हे दुध मिळणे थोडे अशक्य आहे, परंतु शक्य असल्यास हेच दुध प्यावे.


दुधामध्ये लवंग आणि विलायची
ज्या लोकांना दुध पचत नाही त्यांच्यासाठी दुध पिण्याचा आणखी एक उपाय आहे. दुधामध्ये चिमुटभर अद्रक, लवंग, विलायची, केशर, दालचिनी आणि जायफळ इ. सामग्री मिसळावी. यामुळे तुमच्या पोटात अतिरिक्त उष्णता वाढेल आणि यांच्या मदतीने दुध पचण्यास मदत होईल.
Ayurveda tips for drinking milk in marathi

Post a comment

 
Top