0

पती दीड वर्षापासून विदेशात, सुनेला सासूच करत होती अवैध संबंधांचा आग्रह

फिरोजपूर (पंजाब) - बुधवारी सकाळी फिरोजपूरमध्ये 28 वर्षीय महिला रितूचा मृतदेह तिच्याच रूममध्ये पंख्याला लटकलेला आढळला. सासरचे म्हणत होते की, सुनेने गळफास घेतला आहे, परंतु पोलिस पोहोचण्याआधीच मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. सूचना मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या माहेरच्या माणसांनी सासरची मंडळी व त्यांच्या घरी राहणाऱ्या एका तरुणावर तिला ठार करून पंख्याला लटकावल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, पोलिसांसमोर हत्या की आत्महत्या असा गुंता उभा राहिला आहे.
त्यांनी तिच्यावर दबाव टाकला, म्हणून माझ्या मुलीने केली आत्महत्या
कंबोज नगरात कक्कड डॉक्टरवाल्या गल्लीत विवाहितेचा मृतदेह आढळला होता. माहेरच्या मंडळीचा आरोप आहे की, त्यांच्या मुलीची हत्याच झाली आहे. मृत महिलेचे नातेवाईक चेतन चौधरी म्हणाले की, त्यांची नात्याने बहीण लागत असलेल्या रितूचे लग्न 9 वर्षांपूर्वी फिरोजपूरच्या सौरवसोबत झाले होते. त्याच्या सासरची मंडळी त्याला त्रास देत होती. याबाबत अनेकदा बोलणेही झालेले आहे, परंतु त्यांचे वागणे सुधारले नाही. बुधवारी सकाळी सासरच्या मंडळींचा फोन आला की, रितूने आत्महत्या केली आहे. जेव्हा ते त्यांच्या घरी पोहोचले तोपर्यँत रितूचा मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. त्यांना संशय आला की, रितूने आत्महत्या नाही तर तिची गळा दाबून हत्या केली आणि नंतर लटकावले आहे.
दोन मुलांची आई होती रितू, पती दीड वर्षांपासून विदेशात
चेतनने सांगितले की, मृत रितूचा पती मलेशियात आहे. तो विदेशात जाऊन दीड वर्ष झाले आहे. तेथे तो दु:खी आहे, परत येण्यासाठी त्याने अनेकदा फोन केला, परंतु त्याचे कुटुंब त्याला परत येऊ देत नाही. त्यांनीही याबाबत त्या कुटुंबाशी बोलणे केले, परंतु ते ऐकायला तयार नाहीत. चेतनने सांगितले की, रितूचे लग्न त्याच्या कुटुंबानेच 9 वर्षांपूर्वी सौरवसोबत जमवले होते. तिला दोन मुले आहेत. मोठा मुलगा व मुलगी अजून लहान आहे. केसचा तपास करत असलेले एएसआय शर्मा म्हणाले की, रितूचे वडील कृष्ण यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीच्या सासूचे निर्मल नावाच्या तरुणासोबत अवैध संबंध होते. ते लोकं त्यांच्या मुलीलाही त्याच्याशी अवैध संबंध ठेवण्यासाठी मजबूर करू लागले होते. यामुळेच मुलीने आत्महत्या केली. त्यांच्या जबाबाच्या आधारे सासू ज्योती, सासरा पलविंदर कुमार व निर्मल ऊर्फ प्रिन्स यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शेजारच्या रूममध्ये आढळल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या...
रितूच्या रूमच्या शेजारी असलेल्या रूममध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या पाहून असे वाटतेय की, मंगळवारी रात्री काही जणांनी भरपूर दारू प्राशन केली. तेथे मटणाची थाळीही होती. असे दिसतेय की, कुणीतरी दररोज तेथे दारू पीत होते. तेथे दारूच्या एकूण 10 रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत.
married woman suspected death suicide Or murder Mother In Law Pressurize for illegal relationship

Post a Comment

 
Top