लिम म्हणाले, आपण कोणत्या वातावरणात राहतो हे केवळ दाखवू इच्छित आहोत.
सेऊल- उत्तर कोिरयाचे शासक किम जोंग उन आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या वर्षी सिंगापूरमध्ये झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांतील संबंध सामान्य झाले आहेत. मात्र हे राजकीय संबंध दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधील एका कला दालनात द्विशेष पद्धतीने चित्रित केले आहेत. राजकीय उपहासात्मक पद्धतीच्या या प्रदर्शनामध्ये किम जोंग उन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर गोळी झाडताना दिसत आहेत. लोकांना ही बाब खूप आवडत आहेत. या चित्रातील सेटमध्ये त्यांच्या एका हातात पिस्तूल आहे. रेड कार्पेटवर ट्रम्प कोसळलेले दिसतात. यामध्ये इंग्रजीत लिहिले असून त्याचा अर्थ “शो तर सुरूच राहील.’
हा सेटची निर्मिती करणारे ५९ वर्षीय लिम म्हणाले, आपण कोणत्या वातावरणात राहतो हे केवळ दाखवू इच्छित आहोत. सध्याच्या राजकीय जीवनात दोन शक्तिशाली व्यक्तींच्या पावलांकडे पाहून सर्व सामान्य लोक साशंक, भ्यालेले तर कधी उत्साहित व आनंदीही राहतात. या वर्षी सिंगापूरमध्ये १२ जून रोजी ट्रम्प व उन यांच्यात झालेली चर्चा जगभरात चर्चेत होती. त्याआधी दोन्ही नेत्यांत मुलांसारखी शेरेबाजी चर्चेत राहिलेली आहे.

Post a Comment