0
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर समुद्राच्या आत भूस्लखन होऊन  आलेल्या भयंकर त्सुनामीमध्ये  इंडोनेशियात ४३ जण मृत्युमुखी पडले. त्सुनामीचा सर्वांधिक तडाखा जावा आणि सुमात्रा बेटाला बसला.  या दुर्घटनेत ६०० जण जखमी झाले आहेत. दरम्यान त्सुनामीची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. क्रॅकाटो या बेटाची ज्वालामुखीच्या उद्रेक्रातून निर्मिती झाली आहे. याच ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन समुद्राच्या तळाशी भूस्लखन झाल्यान त्याचे रुपांतर मोठ्या त्सुनामीमध्ये झाले. सन १८८३ मध्ये झालेल्या  ज्वालामुखीच्या उद्रेकातून या बेटाची निर्मिती झाली होती. 


इंडोनेशियाचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी इंडोनेशियात आलेल्या त्सुनामीची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुंदा सामुद्रधुनी भागातील जवळपास ४० लोकांचा या त्सुनामीत मृत्यू झाला, तर ५८४ लोक जखमी झाले. दोन नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. सुमात्रा आणि जावा बेटाच्या किनाऱ्यावरील बऱ्याच घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. 

इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या त्सुनामीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. समुद्राच्या भरतीचा काळ आणि समुद्राच्या तळाशी झालेले भूस्लखन यामुळे त्सुनामी आली असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.  सुंदा सामुद्रधुनी जावा आणि सुमात्रा या दोन बेटांच्या बरोबर मध्यभागी आहे.  याच ठिकाणी अनाक क्रॅकाटो हे छोटसं बेट आहे. याच ठिकाणी त्सुनामी आली. या भागातील भूगर्भामध्ये मोठ्या हालचाली होत असतात. त्यामुळे इंडोनेशियात भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्याचमुळे या भागाला 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' असे संबोधले जाते.

Post a Comment

 
Top