0

आज प्रत्येकाजवळ मोबाईल फोन आहे. या फोनमध्‍ये आवडत्‍या गाण्‍यासाठी एक म्‍युजिक गॅलरी आहे. फोनचव्‍या बाकीच्‍या फिचरपेक्षा या म्‍यूजिक गॅलरीचा वापर मोठ्‍याप्रमाणात होत असतो. सकाळी उठल्‍यापासून ते झोपेर्यंत प्रत्‍येकाच्‍या कानात एअरफोन अडकलेले असतात. वेळ जात नाही, उदास वाटत असेल, झोप येत नाही, अशा अनेक कारणावर एक उपाय सगळे करत असतात तो म्‍हणजे गाणी ऐकण्‍याचा. सर्व काम आवरल्‍यानंतर रात्री झोपताना निवांत गाणी ऐकण्‍याची आवड प्रत्‍येकाला असते तर काहीजण झोप येत नाही म्‍हणूनही गाणी ऐकतात. गाणी ऐकतच आपण झोपी जातो. पण हे आरोग्‍यासाठी फायदेशीर आहे का, याचा कधी विचार केला आहे का? केला नसाल तर मग करा. 

ऐअरफोन घालून झोपणे धोकादायक
एका संशोधनानुसार झोपण्‍यापूर्वी गाणी ऐकण्‍यासाठी ऐअर फोन घालून झोपणे धोकादायक ठरु शकते. चांगली झोप लागावी यासाठी या सवयीवर अवलंबून राहण्‍याची वेळ येते. चांगली झोप लागण्‍यासाठी किंवा येण्‍यासाठी  शांत संगीताचा उपयोग होतो. गाणी ऐकल्‍याने मनाला शांतता मिळते. पण आपण हे विसरतो की, आपल्‍या शरीराचे स्‍व:ताची अशी एक दिनक्रिया असते, ती दिनक्रिया असते. अशावेळी आपल्‍या शरीराला दुसरर्‍याच दिनक्रिया किंवा सवय लावतो ज्‍यामुळे आरोग्‍याचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. ज्‍याचा परिणाम झोपेवर होतो. दररोज  कृत्रिम आवाज म्‍हणजे गाणी ऐकत झोपण्‍याचे सवय आरोग्‍यासाठी धोकादायक आहे.
मेंदूला विश्रांतीच मिळत नाही
झोपताना जेव्‍हा गाणी ऐकत असतो तेव्‍हा पूर्णवेळ आपला स्‍मार्ट फोन जवळच असतो. जेव्‍हा विश्रांतीची गरज असते त्‍यावेळी सर्ववेळ स्‍मार्ट फोनवर घालवतो.  त्‍यामुळे मेंदूला खर्‍या अर्थाने जेव्‍हा विश्रांतीची गरज असते त्‍यावेळी मेंदूची कामाची प्रक्रिया चालूच असते. त्‍यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही. 
कानासाठी धोकादायक
जेव्‍हा गाणी ऐकत झोपतो तेव्‍हा मेंदू पूर्णपणे झोपलेला नसतो. मेंदूचे काही भाग ॲक्‍टीव म्‍हणजे कार्यरत असतात. ज्‍यामुळे आपली संपूर्ण झोप होत नाही व मध्‍यरात्री जाग येते किंवा झोप मोड होते. ८ तासाची झोप पूर्ण न झाल्‍यामुळे ह्रद्‍याचे ठोक्‍यांच्‍या गतीत वाढ होते. याचा परिणाम आरोग्‍यावर होतो. झोपताना ऐअर फोन घालून झोपल्‍यामुळे कानाला नुकसान पोहचू शकते. यामुळे कानाच्‍या त्‍वचेवर दाब पडतो. यामुळे कानाशी संबधीत अडचणी निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Post a Comment

 
Top