0
अशा प्रकारे अपघातानंतर दुचाकी व दुचाकीस्वार कंटेनरच्या खाली पडलेले दिसून आले.

वाळूज- कंटेनरच्या मागील चाकाखाली दुचाकी आल्याने तीन दुचाकीस्वार तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३.४० वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्याजवळ घडली. विशाल बरखाडे (२५, रा. पवननगर, रांजणगाव) हा गंभीर जखमी असून राहुल सुरडकर (३५, रा. पवननगर, रांजणगाव) किरकोळ जखमी झाला. या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिसऱ्या जखमी तरुणाचे नाव व पत्ता समजू शकला नाही. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. औद्योगिक कारखाना परिसराकडे जाणाऱ्या कंटेनरच्या मागील चाकाखाली दुचाकीस्वार दुचाकीसह आले. तिघेही खाली पडून जखमी झाले. यात विशालच्या डोके व तोंडाला आणि हाताला जबर मार लागला आहे, तर दोघे मित्र किरकोळ जखमी झाले.

या वेळी विशाल व राहुल यांना तत्काळ प्राथमिक रुग्णालयात दाखल केले, परंतु प्रकृती जास्त गंभीर असल्याने डाॅ. अमोल यांनी पुढील उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. अन्य एकाला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार सुरडकर करत आहेत.Bike accident in Walunj

Post a Comment

 
Top