0
मेसेजमध्ये रिफंडच्या अर्जाबद्दल लिहीले आहे.

नवी दिल्ली- सध्या इनकम टॅक्स विभागाकडून कोकांना एक मेसेज पाठवला जात आहे. या मसेजमध्ये इनकम टॅक्स विभागाकडून रिफंड क्लेम करण्याबाबत सांगितले जात आहे. त्यासाठी विभागाकडून एक लिंकही दिली जात आहे. पण हैरान करणारी बाब म्हणजे हा मेसेज लोकांचे अकाउंट रिकामे करत आहे. खरतर हा मेसेज इनकम टॅक्स विभागाकडून नसून हॅकर्सच्या ग्रूपकडून पाठवला जात आहे. मेसेज मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमची सगळी माहिती हॅकर्सना मिळते.

काय आहे मेसेजमध्ये
या मेसेजमध्ये लिहीले आहे की, इनकम टॅक्स रिफंड मिळवण्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगितले जात आहे. यात रिफंड होणाऱ्या पैशांची माहितीदेखील दिली जात आहे. मेसेजमध्ये बहुतेक लोकांना या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे.(https://bit.ly/2UDXocu) हा मेसेज त्या लोकांना पाठवला जात आहे ज्यांचा मोबाईल नंबर इनकम टॅक्स रि-फिलींगमध्ये दिलेला आहे.

हे होते क्लिक केल्यावर
एखाद्या व्यक्तीने दिलेल्या मेसेजवर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो ओपन होते. या विंडोच्या लिंकमध्ये काही गडबड असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे दुसऱ्या दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर अजून एक पेज ओपन होते जे इनकम टॅक्स विभागाच्या पेज सारखे दिसते. या पेजवर तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेव विचारली जाते.

आरबीआईच्या नावाने केली जात आहे फसवणुक
तुमचे खाते असलेली बँक निवडल्यावर नेटबँकिंगने ऑनलाइन लॉगइन करण्यास सांगितले जाते. त्यानंतर ओपन झालेले पेज रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या पेज सारखे असते. त्यावर लॉगइन करण्यास सांगितले जाते. त्यानंतर तुमची सगळी माहिती हॅकर्सकडे जाते आणि तुमच्या अकाउंटमधून सगळे पैसे काढून घेतले जातात.

इनकम टॅक्स विभागाने दिला नकार
इनकम टॅक्स रिफंडची माहिती अनेक लोकांना मिळाल्यानंतर इनकम टॅक्स विभागाने लोकांना सावधान केले आहे. विभागाकडून सांगण्यात आले आहे की, त्यांच्याकडून अशा प्रकारचे कोणतेही मेसज पाठवले जात नाहीयेत. विभागाने सांगितले आहे की, तुमची फिशींग होऊ शकत, त्यामुळे तुम्ही कोणलाही तुमची खासगी माहीती देऊ नका.beware of fake message coming from fake site of income tax department

Post a Comment

 
Top