0
हिंदी सिनेसृष्‍टीत रामसे ब्रदर्स नावाने परिचीत असलेले प्रसिध्‍द निर्माते, दिग्‍दर्शक तुलसी रामसे यांचे वयाच्‍या ७७ व्‍या वर्षी निधन झाले. बॉलिवूडमध्‍ये ८०-९० च्‍या दशकातील बहुतांशी आलेले हॉरर चित्रपटांचे निर्माते रामसे ब्रदर्स होते. तुलसी रामसे यांनी 'होटल', 'पुराना मंदिर', 'तहखाना', 'वीराना', 'बंद दरवाजा' यासारखे चित्रपट आणले.त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी दिलेल्‍या माहितीनुसार, छातीत दुखू लागल्‍याने त्‍यांना कोकिलाबेन हॉस्‍पिटलमध्‍ये नेण्‍यात आले. तेथे डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत घोषित केले. तुलसी रामसे आपल्‍या ७ भावंडांपैकी एक होते. सर्व रामसे ब्रदर्स चित्रपटाशी निगडित होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या हॉरर चित्रपटांना 'रामसे ब्रदर्स'चे चित्रपट असे म्‍हटले जायचे. 

तुलसी रामसे यांनी २००६ मध्‍ये 'आत्मा' चित्रपट प्रोड्यूस केला होता. त्‍यानंतर, त्‍यांचा कुठलाही चित्रपट किंवा शो आला नाही. १९९३ मध्‍ये त्‍यांनी प्रसिध्‍द हॉरर टीव्‍ही शो 'जी हॉरर शो'चेदेखील दिग्‍दर्शन केले होते.

Post a comment

 
Top