आभाळे यांनी काही नातेवाईक, हितचिंतक व मित्रांकडून उसने पैसे घेतले होते. ते वेळेत परत न केल्याने संबंधितांनी तगादा लावल्याने आभाळे विमनस्क अवस्थेत होते. त्यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास आभाळे आपल्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा शोधाशोध सुरू झाला. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास प्रवरानदीच्या काठावरील बीजगुणन क्षेत्रावरील (शेतकी फार्म) पंढरी शंकर आभाळे यांच्या मालकीच्या शेतात राजेंद्रचा यांचा मृतदेह तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत आढळला.

Post a Comment