0
पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या किमतीत होणार वाढ

ऑटो डेस्क - आपल्या देशात 18 वर्षे पूर्ण असल्याशिवाय वाहन चालविण्याचा परवाना मिळत नाही. पण तरीही काही अल्पवयीन मुले वाहतुकीचे नियम ढाब्यावर बसवून बेकायदेशीररित्या विना परवाना वाहन चालवतात. पण आता केंद्र सरकार लवकरच 16 ते 18 वयोगटातील तरुणांना वाहन परवाना देण्याची परवानगी देणार आहे. पण ही परवानगी फक्त 4 किलोव्हॅट स्कूटर चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. देशात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार याबाबतची घोषणा या महिन्याच्या शेवटपर्यंत करू शकते. या निर्णयाबाबतची तयारी जोमात सुरू आहे.


कायद्यामध्ये होत आहे मोठा बदल

देशात वाहन चालविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वाहन कलम 1989 च्या सेक्शन 10 नुसार अल्पवयीन मुलांना कोणत्याही प्रकारचे गिअर वाहन चालविण्याची परवानगी नाहीये. पण विना गिअरचे 50 सीसीच्या गाड्या चालविण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या या प्रकारच्या गाड्यांची किंमत 60 ते 70 हजारांपर्यंत आहे. तर एकदा चार्ज केल्यास या गाड्या 70 ते 100 किलोमीटरपर्यंत धावू शकतात. .


देशात या गाड्यांना देण्यात येत आहे प्रोत्साहन
देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक पाऊले उचलत आहे. देशातील 30 ते 40 टक्के गाड्या 2030 पर्यंत इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बदलण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या किमतीत वाढ करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याबाबतच्या योजनेवरही सरकार काम करत आहे. प्रदूषण नियंत्रण आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीला प्रोत्साहीत करण्याचा सरकारचा उद्देश्य आहे. यासाठी सरकार पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर अतिरिक्त सेस लावण्याच्या योजनेवर काम करण्यात येत आहे.

पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या किमतीत होणार वाढ
सरकाने पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर सेस लावल्यानंतर या वाहनांच्या किमतीत वाढ होणार असली तरी Faster Adoption and Manufacturing of Electric and Hybrid Vehicle (FAME) scheme अंतर्गत इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार तसेच दुचाकी खरेदी करण्यासाठी सरकारतर्फे सब्सीडी देण्यात येत आहे. या योजनेसाठी अतिरिक्त पैशाची गरज भासणार आहे. त्यामुळे या पैशाचे ओझे वित्त मंत्रालयावर पडू नये यासाठी सरकार पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर ग्रीन टॅक्स आकारण्याची योजना तयार करत आहे.To promote electric vehicle government will change law

Post a comment

 
Top