0
रिसेप्शनमध्ये नटून-थटून पोहोचली कपिल शर्माची बहीण, आईनेही केला होता मेकअप,शुभेच्छा द्यायला पोहोचले कपिलचे सहकलाकार,

मुंबईः अमृतसर येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचे वेडिंग रिसेप्शन संपन्न झाले. यावेळी गिन्नी लाइट ग्रीन लहेंग्यात तर कपिल महरुन कलरच्या शेरवानीतच दिसला. कपिलच्या कुटुंबातील सदस्यही नटूनथटून रिसेप्शनमध्ये पोहोचले. विशेषतः कपिलची बहीण पूजा देवगण यावेळी अतिशय सुंदर दिसली. तिने सलवारसूट परिधान केला होता. भांगात मांगटीका, कानात स्टायलिश इअररिंग्स आणि गळ्यात तिने हेवी नेकलेस घातला होता. कपिल त्याच्या बहिणीच्या अतिशय जवळ आहे. कपिलच्या शेजा-यांनी सांगितल्यानुसार, कपिल जेव्हाही मुंबईहून अमृतसरला जातो, तेव्हा तो स्वतःच्या घरी नव्हे तर बहिणीच्या घरी किंवा एखाद्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असतो.
दोन पद्धतीने झाले कपिल-गिन्नीचे लग्न...

- कपिलच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये त्याची आई जनकराणी याही अतिशय सुंदर दिसल्या. त्यांनी ब्लू कलरचा सलवार सूट आणि गळ्यात सोन्याचा हार घातला होता.


- कपिलचा थोरला भाऊ ब्लॅक सूटमध्ये दिसला.


- रिसेप्शनला कीकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि चंदन प्रभाकर पोहोचले होते.


- कपिल आणि गिन्नी यांचे हिंदू आणि शीख पद्धतीने लग्न संपन्न झाले. 12 डिसेंबर रोजी हिंदू आणि 13 डिसेंबर रोजी हे जोडपं शीख पद्धतीने विवाहबद्ध झालं.


- येत्या 24 डिसेंबर रोजी कपिल मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार असून यामध्ये टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलेब्स सहभागी होणार आहेत.Kapil Sharma And Ginni Chatrath Wedding Reception Held In Amritsar

Post a comment

 
Top