0
पाहणारे म्हणाले कंसही इतका निर्दयी नव्हता.

जमशेदपुर (झारखंड़)- बहिनीने रागवले म्हणून भावाला आला इतका राग की, त्याने एकुलत्याएक भाच्याची केली निघृण हत्त्या. सुनसान जागी नेऊन आधी तोडले हात-पाय नंतर दगडाने चेहरा ठेचला. त्यानंतर मृतदेहाला झुडपात फेकून तो फरार झाला. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहून त्याची आई चक्कर येऊन पडली आणि वडीलांनी हंबरडा फोडला.

- 15 डिसेंबरला चिमुकल्याचा वाढदिवस होता त्याची तयारी मुलाचे वडील धर्मेंद्र आणि आई करत होते पण त्याआधीच त्यांच्या मेव्हूण्याने त्यांच्या आनंद हिरावून घेतला. आरोपी मामा 22 वर्षीय आशुतोष झा उर्फ अनिकेत उर्फ मुन्नाने शुभमची अमानुषणे हत्त्या केली.

8 तास मुलाचा घेतला शोध, सकाळी मिळाला मृतदेह

मुलाची आई शारदा मिश्रा उर्फ रजनी यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी मुन्ना त्यांच्या घरी आला होता. नवऱ्यासोबत जेवण केल्यानंतर तो शुभमसोबत रूममध्ये बसला. त्यानंतर नवरा कामावर निघून गेला. त्यानंतर मुन्नाने शुभमला चापट मारली म्हणून तो रडू लागला तेव्हा मी मुन्नाला रागवले म्हणून त्याला राग आला. संध्याकाळी कुरकूरे देण्याचे सांगून तो शुभमला घेऊन गेला आणि वापस आलाच नाही.

शवविच्छेदन अहवालाने सगळ्यांना केले स्तब्ध

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, मुलाला बांधून त्यासा पोटावर, डोक्यावर आणि शरीराच्या अन्य भागावर मारले गेले आहे. पोटाच्या उजव्या बाजुला वीटेने मारले आहे त्यामुळे तेथे रक्त गोठल्याची खुण झाली आहे. त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारले की, त्याच्या डोळ्यातून

रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्याचा एक हातही तोडण्यात आला आहे.

सकाळी फोन करून म्हणाला- घेतला ना मी सुड

घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुन्नाने कॉल केला आणि म्हणाला, पाहिले ना कसा घेतला मी सुड, जो कोणी माझा तिरस्कार करेल त्याचा मी सुड घेणार...

Post a comment

 
Top