0
जयपूर - राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी पाली येथील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. या निवडणुकीत पराभव ठरलेला असल्याने काँग्रेस आतापासूनच पराभवाची कारणे शोधत आहे, असे मोदी म्हणाले. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील दलालाला भारतात आणले आहे, आता तो सोनियाजी आणि त्यांच्या तत्कालीन सरकारची अनेक रहस्ये उघड करेल असे मोदी यावेळी बोलताना म्हणाले.


काय म्हणाले मोदी...
> काँग्रेसने नेहमीच देशात विष पसरवण्याचे काम केले आहे. मग ते जातीवादाचे असो किंवा गरीब-श्रीमंतात असो 
> तुम्हाला फक्त एवढी आठवण करून देतो की, काँग्रेसने आजवर एवढे पाप केले आहेत की, ते तुमचे कधीही भले करू शकत नाही. 
> जामीनावर बाहेर आलेल्याला कॉलनीत इज्जत मिळत नाही, कोणी त्याला मुलगी देत नाही मग तुम्ही जामीनावर बाहेर आलेल्या व्यक्तीच्या हातात राजस्थान द्याल का.. 
> कधी कोणी विचार केला नसले की, चार पिढ्या देश चालवणाऱ्यांना एक चहावाला न्यायालयापर्यंत घेऊन जाईल. कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी ते जामीनावर बाहेर आहेत.


यापूर्वीही केला होता हल्लाबोल 
पंतप्रधानांनी यापूर्वीही प्रचारात राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. नागौर येथील सभेमध्ये मोदींनी नामदार शब्दाचा वापर करत राहुल गांधींना टोमणा मारला होता. तसेच एका सभेत मोदी म्हणाले होते, ज्या लोकांना हे माहिती नाही की, हरभऱ्याचे रोप असते की झाड, आणि मूग तसेच मसुरात फरक काय ते आज देशाला शेती शिकवत आहेत. आम्ही याठिकाणी आमच्या नातवांच्या भलाईसाठी नव्हे तर तुमच्या विकासासाठी मते मागत आहोत, असेही मोदी म्हणाले होते.PM Modi attacked on Rahul, Sonia and congress on last day of election

Post a Comment

 
Top