0
मदतीच्या बहाण्याने विश्वास संपादन करून महिलांवर करत होती अत्याचार

बारामती- मदतीच्या बहाण्याने विश्वास संपादन करून महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला बारामती पोलिसांनी अटक केली आहे. एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्याविरोधात अन्य एका महिलेनेही बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. मच्छिंद्र टिंगरे असे या आरोपीचे नाव अाहे.

तक्रारीनुसार, संपत्तीच्या कारणावरून पीडितेच्या पतीने तिच्या वडिलांसह बहिणीची हत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती तुरुंगात आहे. दरम्यान, मच्छिंद्रने तिचा विश्वास संपादन केला. तुरुंगातून बाहेर सुटल्यावर तो तुलाही मारून टाकेल, अशी भीती दाखवत पीडितेला वडिलोपार्जित जमीन विकायला लावून ३५ लाख २० हजार रुपये लुबाडले व अत्याचारही केला.

अत्याचाराची कोठे वाच्यता केल्यास मुलांना जिवे मारण्याची व पीडितेची नग्नावस्थेतील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी दिली. बारामती पोलिसांनी मच्छिंद्रची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. दरम्यान, अन्य एका महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे.journalist arrested in the case of womens abausing in Baramati

Post a Comment

 
Top