0
विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या कपड्यांचा तीव्र विरोध केला आहे.

अहमदाबाद - गुजरातमध्ये हनुमान मंदिरात मूर्तीला सॅन्टा क्लॉजचे कपडे घातल्याने वाद निर्माण झाला आहे. बोटाद जिल्ह्यातील सारंगपूर मंदिरात दिवसात दोन वेळा देवाच्या श्रीविग्रहाचे वस्त्र बदलण्याची परंपरा आहे. त्यामध्ये रविवारी हनुमानाला सॅन्टाचे कपडे घालण्यात आले आहेत. मंदिराचे मुख्य पुजारी विवेक सागर यांनी त्यावर काहीच आक्षेप नसल्याचे सांगितले. हे कपडे अमेरिकेत राहणारे भाविक धमर भाई यांनी पाठवले आहेत असेही ते म्हणाले. परंतु, विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या कपड्यांचा तीव्र विरोध केला आहे.


पुराजी विवेक सागर यांनी सांगितल्याप्रमाणे, "सध्या धर्नुमास सुरू आहे. परंपरेनुसार देवाला रोज दोन वेळा वेग-वेगळे कपडे घातले जातात. मुळात गोष्टीवर वाद होणे चुकीचे आहे. हे कपडे उबदार आणि मऊ आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये देवाला अर्पित करण्यात आले आहेत." मंदिरात हनुमानाला लाल रंगाची टोपी आणि पोशाख घालण्यात आला आहे.
टोपीच्या किनाऱ्यांवर पांढऱ्या रंगाची उबदार लेस आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या कपड्यांचा तीव्र विरोध केला. सॅन्टा क्लॉजचे बदलून हनुमानाला ताबडतोब दुसरे कपडे घालण्यात यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
Controversy after pujari gives santa look to Hanuman in Gujarat Temple

Post a Comment

 
Top