0
 • बुलंदशहर/लखनऊ - गोहत्येच्या अफवेमुळे हिंसक झालेल्या जमावाने सोमवारी यूपीच्या बुलंदशहरात इन्स्पेक्टर सुबोध सिंह यांची डोक्यात गोळी झाडून हत्या केली. गोळी लागल्यानंतरही जमाव त्यांना मारहाण करत होता. पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, त्यांच्या गुडघा, कंबर, खांदा व पाठीवर लाठ्यांचे वळ आढळले आहेत. जीपमध्ये सुबोध यांच्यासोबतचे शिपाई पळून गेले. गोहत्येच्या संशयावरून दादरीतील अखलाखच्या मॉब लिंचिंग प्रकरणात सुबोध सिंह हे तपास अधिकारी होते. मात्र, त्यांची बुलंदशहरला बदली झाली होती.
  जमावाने पोलिस चौकी व वाहने जाळून टाकली. चकमकीत गोळी लागून एकाचा मृत्यू झाला. ही घटना बुलंदशहर-गड हायवेवर चिंगरावठी चौकीजवळ घडली. बुलंदशहरमध्ये इज्तेमासाठी मुस्लिम मोठ्या संख्येने जमले होते. सोमवारी इज्तेमाचा शेवटचा दिवस होता. प्रशासनाने परतणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यात रोखली. संध्याकाळपर्यंत बहुतांश लोकांना परत पाठवले.
  जमावाने पोलिसांना घेरून तुफान दगडफेक केली. जमावातून गोळीबार झाला. त्यात इन्स्पेक्टरचा मृत्यू झाला. एक शिपाई गंभीर जखमी आहे.
  हत्येनंतर जमावाने व्हिडिओही तयार केला 
  जिल्हा मॅजिस्ट्रेट अनुजकुमार झा म्हणाले, समजवल्यानंतरही आंदोलक अडून बसले होते. सबडिव्हिजनल मॅजिस्ट्रेट अविनाशकुमार मौर्य यांच्या उपस्थितीत पोलिसांनी लोकांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावर जमावाने दगडफेक सुरू केली. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. संतप्त जमावाने चौकीसमोरची वाहने जाळून टाकली. इन्स्पेक्टरच्या हत्येनंतर जमावाने जीपला लटकलेल्या त्याच्या मृतदेहाचाही व्हिडिओ बनवला.
  ट्रॅक्टर-ट्रॉलींत अवशेष भरून रास्ता रोकोसाठी आल्या हिंदू संघटना 
  एडीजी (कायदा-सुव्यवस्था) आनंदकुमार म्हणाले, महाव गावाच्या माजी सरपंचाने शेतात गोवंशचे कथित अवशेष सापडल्याची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पोलिस कारवाई करत होते. दरम्यान, हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत ग्रामस्थांनी अवशेष ट्रॅक्टर-ट्रॉलीत भरून पोलिस चौकीत आणले. त्यांनी बुलंदशहर-गड महामार्ग रोखून धरत वाहतूक कोंडी केली.
   या भागात गोमांस भक्षणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र तक्रारी देऊनही पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत. यामुळे पोलिसांबाबत लोकांत नाराजी आहे. - डॉ. भोला सिंह, बुलंदशहरचे भाजप खासदार
  २ एसआयटी स्थापन, एक मांस सापडल्याची, दुसरी हत्येची चौकशी करणार 
  या प्रकरणी दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. एडीजी आनंद म्हणाले, एक एसआयटी गोवंशाचे अवयव सापडल्याची व ग्रामस्थांच्या आक्रोशाची चौकशी करेल. गोमांस भक्षण प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल झाला. दुसरी एसआयटी सुबोध आणि चिंगरावठीच्या तरुणाच्या मृत्यूची चौकशी करेल. या घटनेच्या व्हिडिओवरून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
  police inspector dead during uttar pradesh mob attacked

Post a Comment

 
Top