0
फास लावून बिबट्याची शिकार केल्याचा प्रकार हल्ल्याळ तालुक्यात उघडकीस आला असून, त्याबद्दल तिघांना अटक करण्यात आली आहे.स्टॅन्ली मोबेन (वय 57), सुभाष पुजारी (वय 35) आणि बाबू गोरगे (वय 40) अशी तिघांची नावे आहेत. या तिघांकडून वनाधिकार्‍यांनी बंदूक, फास, एअरगन, एअर रायफल, गन पॉवडर आणि इतर साहित्य जप्त केले. गोबराळ (ता. हल्याळ) हे दांडेली नागरगाळी-बेळगाव मार्गावरील छोटेसे गाव आहे. हा भाग पूर्णपणे अरण्य प्रदेशाने व्यापरलेला आहे.  बर्ची जंगलात बिबट्याची शिकार करण्यात आल्याची खबर मिळताच वनाधिकार्‍यांनी गोबराळ येथील स्टॅन्लीच्या घरावर छापा घालून रानडुकराचे दोन किलो मांस, वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी दोन बंदुका, गोळ्या, एअर रायफल आदी साहित्य जप्त केले.
हल्याळ डीएफओ डी. यतिराज यांच्या मार्गदर्शनाखाली एसीएफ विवेक कवरी, बची आरएफओ वागीश बी.जे. आणि वन कर्मचार्‍यांनी कारवाई केली.  संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 11 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

Post a Comment

 
Top