0
डॉक्‍टर रेप करताना मेडिकल चालकाने केले रेकॉर्ड, पीडितेला ब्लॅकमेल करत त्यानेही केले शोषण

मुंबई- कम्पाउंडर मुलीवर नराधम डॉक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे, हॉस्पिटल शेजारी असलेल्या मेडिकल स्टोअर्स मालकाने या दुष्कृत्याचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यानेही पीडितेवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
पीडित मुलगी हॉस्पिटलमध्ये कम्पाउंडर म्हणून करत होती. कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून डॉ. ताज अन्सारी व मेडिकल स्टोअर्सचा मालक दिलदार शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम डॉक्टरला अटक केली असून मेडिकल चालक फरार आहे.
कल्याण (पूर्व) मधील तिवली परिसरात आरोपी डॉ.ताज अन्सारी याचे हसन क्लिनिक सेंटर आहे. पीडित मुलगी हॉस्पिटलमध्ये कम्पाउंडर म्हणून काम होती. पीडितेच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने डॉ.ताज हा फायदा घेत होता. कामावून काढून टाकेल, अशी तो तिला वारंवार धमकीही देत होता. काही महिन्यांपूर्वी नराधम डॉक्टरने तिच्यावर हॉस्पिटलमध्येच बलात्कार केला होता. याबाबत कुठे वाच्यता केल्यास बदनामी करेल, अशी धमकीही दिली होती. दरम्यान, शेजारी असलेल्या मेडिकल स्टोअर्सचा मालक दिलदार शेख याने डॉक्टरच्या दुष्कृत्याचा व्हिडिओ तयार केला. त्याने व्हिडिओ पीडितेला दाखविला. नंतर तिला व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने भेदरलेल्या पीडितेने आपल्या घरी हा आपबिती सांगितली. या प्रकरणी डॉ.ताज आणि दिलदार शेख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Compounder Girl raped by doctor and Medical shop owner in Kalyan Mumbai

Post a comment

 
Top