0

बुधवारी रात्री एका अवॉर्ड सेरेमनीत रणवीर सिंह आणि सारा अली खानसोबत सिद्धार्थने धरला होता ताल..


  • मुंबईः रणवीर सिंह आणि सारा अली खान यांचा एक व्हिडिओ समोर आला असून यात दोघे त्यांच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटातील 'आंख मारे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघांसोबत मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही ताल धरताना दिसतोय. खास गोष्ट म्हणजे 'गोलमाल' या बॉलिवूड चित्रपटात झळकलेल्या सिद्धार्थला बघून अनेक लोक कन्फ्यूज झाले आहेत. सूट बूटमध्ये असलेला सिद्धार्थला लोक करण जोहर समजू लागले आहेत.

    यूजर्सनी दिल्या या कमेंट्स...
    - व्हिडिओ बघून एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, "मला वाटले हा करण जोहर आहे. दोन नमुने साराच्या शेजारी दिसत आहेत." आणखी एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, "व्हिडिओच्या शेवटी माझ्या लक्षात आले की, हा करण जोहर नाही." एका यूजरने लिहिले, "सुरुवातीला मला वाटले हा करण जोहर आहे, मग विचार केला की, तो एवढा चांगला डान्स नाही करु शकत." रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' या चित्रपटात सिद्धार्थ जाधवने पोलिसाची भूमिका वठवली असून हा चित्रपट 28 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Post a Comment

 
Top