0
नवी दिल्ली : विजय माल्याच्या बँकांचे कर्ज फेडण्याचा प्लॅन मोडू शकतो. 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या माल्याने बँकांचे कर्ज परत करणार असल्याचे सांगितले पण त्याची सावत्र आई माल्याने मध्येच विजय माल्याला आपला हक्क मागितला आहे. यामुळे कदाचित विजय माल्याचा कर्ज फेडण्याचा प्लॅन गडबडू शकतो.

काय आहे हे पूर्ण प्रकरण.. 
लंडनच्या कोर्टाने सोमवारीच विजय माल्याला भारताला समर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे माल्याला ब्रिटनहून भारतात येण्याचा रस्ता मिळाला आहे. भारतात आल्यानंतर त्याला कोर्टात उभे केले जाईल आणि काही दिवस जेलमध्येही राहावे लागेल. पण जर सरकारने त्याचा कर्ज परत करण्याचा प्रस्ताव स्वीकारला तर त्याला थोडीफार सवलत मिळू शकते. पण याची शाश्वती फारच कमी आहे. कारण माल्याने याअगोदरही असे आश्वासन दिले होते.

सावत्र आईने मागितला माल्याकडे आपला हक्क.. 
विजय माल्याची आई रितू माल्याने तिचेब शेअर न विकण्यासाठी कर्नाटक हाय कोर्टात केस केली आहे. माल्याने कर्ज फेडण्यासाठी बॅंकांना सेटलमेंटची ऑफर दिली आहे. त्यामुळे त्याची आई स्वतःच्या हक्कासाठी आता चिंतीत आहे. त्यांनी युनायटेड ब्रेवरेज होल्डिंग लिमिटेड (यूबीएचएल) मधील आपला हक्क मिळावा यासाठी कोर्टात केस केली आहे. त्यांचे यूबीएचएल मध्ये काही शेअर आहेत. आणि त्यांना शंका आहे कि विजय माल्या बँकांशी सेटलमेन्ट करताना त्यांचे शेअर विकून टाकेल. मात्र त्यांचे या कंपनीत किती शेअर आहेत हे कळालेले नाही.vijay mallya's step mother throws kes against him

Post a Comment

 
Top