0
बाथरूममध्ये पाहिल्यानंतर कुटुंबातील लोकांचा बेजबाबदारपणा समोर आला. बाळाचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

अजमान - यूएई (संयुक्त अरब अमिरात) मध्ये झालेल्या एका दुःखद घटनेत 4 वर्षांच्या चिमुरड्याचा वॉशिंग मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला आहे. हा चिमुरडा खेळता-खेळता वॉशिंग मशीनपर्यत गेला आणि चुकून त्याच्या आत अडकला गेला. त्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये बुडाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिस सध्या हा प्रकार दुर्घटना समजून तपास करत आहेत. अपघाताच्या वेळी हा मुलगा रवाडा येईत घरी आजी आणि काकाबरोबर होता.

घरात सापडला नाही मुलगा
- ही घटना यूएईच्या अजमान शहराच्या अल रवाडा परिसरात बुधवारी घडली. बाळाची आई त्याला आजी आणि काकाकडे सोडून गेली होती. महिला परत आली तेव्हा बाळ घरामध्ये नव्हते. आजी आणि काकाने सांगितले की, घराचा दरवाजा दिवसभर पूर्णपणे बंद होता. त्यानंतर त्यांनी बाळाला शोधण्यास सुरुवात केली.
- बाथरूममध्ये जाऊन पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, वॉशिंग मशीन सुरू आहे आणि बाळ त्यात अडकलेले आहे. त्यानंतर काकाने फ्रंट लोडींग मशीनचा दरवाजा तोडून बाळाला बाहेर काढले. पण तोपर्यंत त्याने प्राण गमावले होते.
- बाळ खेळण्यासाठी बाथरूममध्ये गेले होते. त्यावेळी वॉशिंग मशीन ठेवली होती आणि त्यात गरम पाणी भरलेले होते. बाळ त्यात गेले आणि दार आतून लावून घेतले. त्याचदरम्यान मशीन सुरू झाली आणि बाळाचा त्यात बुडून मृत्यू झाला.
- पोलिस म्हणाले की, बाळ उत्सुकतेपोटी मशीनमध्ये गेले असेल आणि आत फसले असेल. आई बाळाला न्यायला आली तेव्हा शोधाशोध झाली आणि मशीन तोडून बाळाला बाहेर काढण्यात आले. बॉडी पोस्टमॉर्टर्मसाठी पाठवली असून चौकशी सुरू आहे.
4 years old boy died after he stuck in washing machine

Post a comment

 
Top