0
  • France PM Philippe to halt fuel tax rise amid violent protest across the countryपॅरिस - गेल्या कित्येक दिवसांपासून महागाईच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात धुमसणाऱ्या फ्रान्समध्ये नागरिकांचा विजय झाला. पेट्रोल-डीझेलसह महत्वाच्या वस्तूंवर कर वाढवण्यास आग्रही असलेल्या सरकारने आंदोलकांपुढे गुडघे टेकले. वाढत्या हिंसक आंदोलनाच्या घटना पाहता. पंतप्रधान एड्वार्ड फिलिप यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला काही दिवसांपूर्वीच हिंसक वळण लागले. शेकडो लोक जखमी झाल्यानंतर सरकारला जाग आली आणि आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. यापुढे 6 महिने इंधनाच्या दरात वाढ होणार नाही.
    वर्षभरात 23 टक्क्यांनी वाढले इंधनाचे दर
    फ्रान्समध्ये डीझेल हे वाहनांमध्ये वापरले जाणारे प्रमुख इंधन आहे. सर्वात जास्त वापरल्या याच इंधनात सरकारने विविध प्रकारचे कर वाढवले. त्यामुळे, इंधनाचे दर गेल्या वर्षभरात 23 टक्क्यांनी वधारले होते. इंधन दरवाढीवर नागरिक संतप्त असतानाच तोट्याची कारणे दाखवत सरकारने इंधन आणखी महाग करण्याचा प्रस्ताव आणला होता. त्यावरूनच संतप्त नागरिक रस्त्यांवर उतरले आणि साऱ्या जगाने जनाक्रोश पाहिला.

    300 हून अधिक आंदोलकांना अटक, शेकडो जखमी
    सरकारने देशाचे उत्पन्न वाढण्यासाठी पेट्रोल डीझेलवरील कर वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला देशभरातील नागरिकांनी विरोध केला. एकट्या राजधानी पॅरिसमध्ये 36000 नागरिक रस्त्यांवर उतरले. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला काही दिवसांपूर्वीच हिंसक वळण लागले. कित्येक गाड्या पेटवण्यात आल्या. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. पॅरिसमध्ये दंगलखोर आणि पोलिसांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत 23 पोलिसांसह 200 हून अधिक नागरिक जखमी झाले. या प्रकरणात विविध परिसरातून आतापर्यंत 300 जणांना अटक करण्यात आली.

Post a Comment

 
Top