0
इस्रोचा जीसॅट-७ ए उपग्रह प्रक्षेपणानंतर २० मिनिटांत कक्षेत स्थिरावला, हवाईदलाची शक्ती वाढणार

श्रीहरिकोटा. इस्त्राेने बुधवार सायंकाळी ४ वाजून १० मिनटांनी सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन संचार उपग्रह जीसॅट-७ ए चे यशस्वी प्रक्षेपण केले. जीएसएलव्ही-एफ ११ या रॉकेटने प्रक्षेपणानंतर २० मिनटांत उपग्रहास निर्धारित कक्षेत स्थिर केले. श्रीहरिकोटाहून यावर्षात झालेले हे सातवे प्रक्षेपण हाेते. हा उपग्रह हवाई दलासाठी संवाद प्रणाली अधिक चांगली करेल. यामुळे एअरक्राॅफ्टमध्ये हवेतल्या हवेत निर्धारित वेळेत संपर्क हाेईल. मैदानावरुन संपर्काची गरज राहणार नाही. उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर ‘दिव्य मराठी’शी बाेलताना इस्त्राेचे चेअरमन के. सिवन म्हणाले की, ३५ दिवसांत श्रीहरिकोटाहून इस्त्राेचे झालेले हे तिसरे प्रक्षेपण अाहे. या उपग्रहास ग्रिगोरियन एंॅटीना लावला अाहे. त्याचा वापर सर्वसामान्य नागरिक व लष्कर संवादासाठी करता येईल. जीएसएलव्हीचे हे सलग सहावे यशस्वी प्रक्षेपण अाहे. पुढील वर्षी एफ-१० व एफ-१२ हे उपग्रह अामच्यासाठी अाव्हान अाहे. ते म्हणाले की, सन २०१९ मध्ये चंद्रयान-२ सह ३२ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार अाहे.

- रडार, हवाईतळ व एअरबाेर्न अर्ली वाॅर्निंग अंॅड कंट्राेल विमानांना अापसात जाेडेल. यामुळे विमाने हवेतच परस्परांशी संपर्क साधू शकतील.
- या माध्यमातून दीर्घ पल्ल्यावरील काेणतेही विमान व युद्धनाैकांचा शाेध घेऊ शकेल.
- ड्राेनद्वारे ग्राउंड स्थानकापर्यंत व्हिडिअाे व छायाचित्रे पाठवून निगराणीस मदत करेल.
-‘जीसॅट-७ ए’ इतर उपग्रह व ग्राउंश स्थानकावरील रडारसह भारतीय समुद्री क्षेत्रातील स्थानकांचे कव्हरेज वाढवेल.
- दीर्घ पल्ल्यावरील ड्राेन, यूएव्हीच्या माध्यमातून शत्रूच्या तळांवर हल्ल्याची रेंज वाढवण्यासाठी नियंत्रणात साह्य करेल. भारत अमेरिकेकडून गार्झियन ड्राेन खरेदी करण्याची तयारी करताेय. ते अधिक उंचीवरून लक्ष्यावर हल्ला करू शकते.

35 दिवसांत प्रक्षेपित झाले हे चार उपग्रह
१४ नाेव्हेंबर : जीएसएलव्ही मार्क-३ डी-२ द्वारे ‘जीसॅट-२९’
२९ नाेव्हेंबर : पीएसएलव्ही सी-४३ द्वारे ‘हायसिस’
१९ डिसेंबर : जीएसएलव्ही एफ- ११ द्वारे ‘जीसॅट- ७ ए’
५ डिसेंबरला फेंचगुयाना (विदेशी जमिनीवरून) द्वारे ‘जीसॅट-११’

काय अाहे ‘जीसॅट-७ ए’
२,२५० किलाेग्रॅम वजन
पेलाेड केयू बंॅड ट्रान्सपाॅंडर्स
८ वर्षे माेहिमेचा कालावधी
८०० काेटी रु. एकूण खर्च

काय अाहे केयू बंॅडचा फायदा?
{ लहान अंॅटेनाद्वारेही सिग्नल प्राप्त केले जाऊ शकतात.
{ इतर काेणत्याही बंॅडच्या तुलनेत अधिक बीम कव्हरेज देताे.
{ पाऊस व इतर ऋतूंतील अडथळ्यांनी कमी प्रभावित हाेताे.
Easy contact possible in the air in Air force planes

Post a Comment

 
Top