0
जगभरात 200 मिलियन लोक व्हॉटस्ऍपचा वापर करतात. मात्र, त्या माध्यमातून येणाऱया फेक न्यूजमुळे काही ठिकाणी सामाजिक अशांतता निर्माण झाली तर काही ठिकाणी दंगली घडल्या आहेत. या फेकन्यूज कशा ओळखाव्यात व व्हॉटस्ऍपचा चांगला वापर कसा करावा, यासंदर्भात सातारा जिल्हा पोलीस व व्हॉटस्ऍपतर्फे डिजिटल इमपॉवरमेंट फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद लाभला. दोन सत्रात झालेल्या या कार्यशाळेत सातारा पोलीस तसेच विविध कॉलेजमधील युवक-युवतींना मार्गदर्शन करताना डिजिटल इमपॉवरमेंट फाऊंडेशनचे रवी गुरिया यांनी व्हॉटस्ऍपचा वापर चांगल्या संवादासाठी करा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी व्हॉटस्ऍपच्या विविध फिचर्सचा वापर करा करावा याबाबतही सविस्तर माहिती दिली.
व्हॉटस्ऍपवर अफवा पसरवण्यात येत असल्याने देशात विघातक घडू लागल्या आहेत. यामुळे मॉबलिंचिग, टोलरिंगसारखे प्रकार घडण्याबरोबरचा व्हॉटस्ऍपचा गैरवापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉटस्ऍपला केंद्र सरकारने तंबी दिल्यानंतर व्हॉटस्ऍप कंपनीने वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहिराती देवून जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचबरोबर दिल्लीच्या डिजिटल इमपॉवरमेंट फाऊंडेशनच्या सहकार्याने व्हॉटस्ऍपचा वापर कसा करावा व कसा करु नये याबाबत जाणीवा निर्माण करणाऱया कार्यशाळा घेण्यास आरंभ केला आहे. त्यातील राज्यातील पहिली कार्यशाळा सातारा जिल्हा पोलीस व व्हॉटस्ऍपतर्फे डिजिटल इमपॉवरमेंट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अलंकार हॉलमध्ये पार पडली.

Post a Comment

 
Top