0

रणवीर सिंहच्या रूपात रोहित शेट्‌टीला परफेक्ट कास्टिंग मिळाले आहे.


स्टार रेटिंग 3/5
कलाकार रणवीर सिंह, सारा अली खान, आशुतोष राणा, सोनू सूद, सिद्धार्थ
दिग्दर्शक रोहित शेट्‌टी
निर्माता करण जोहर, रोहित शेट्‌टी, हीरू यश जोहर, अपूर्व मेहता
संगीतकार तनिष्क बागची, लिजो जॉर्ज, एस थामन
श्रेणी अॅक्शन
रनिंग टाइम 2 तास 45 मिनिटे
रोहित शेट्‌टीच्या 'आता माझी सटकली' फेम बाजीराव सिंघम (अजय देवगण) ची झलक सिम्बा संग्राम भालेराव (रणवीर सिंह) मध्ये थेट दिसते. एकीकडे सिंघम, एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर होता. तर दुसरीकडे सिम्बा मात्र एक भ्रष्ट पोलीस असल्याचे दाखवले गेले आहे. त्याला बेईमानी करून जास्त पैसे कमवायला काहीही चुकीचे वाटत नाही.

पॉइंट्स जे बनवतात सिम्बाला वेगळे.. 
- टवाळखोराची भूमिका आणि रणवीर सिंह

'सिम्बा' रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटातील नायकांपेक्षा थोडा वेगळा आहे. तो आत्मकेंद्री आहे. पोलिसांचा यूनिफॉर्म त्याच्यावर एकदम सूट करतो. तो खूप टवाळखोर आणि चेष्टा-मस्करी करणारा दाखवला आहे. त्याचा सेंस ऑफ ह्यूमर मुळीच चांगला नाही. तो स्वतःला आणि पोलिसांच्या कामला गांभीर्याने घेत नाही. अशा आगळ्यावेगळ्या भूमिकेत रणवीर सिंहच्या रूपात रोहित शेट्‌टीला परफेक्ट कास्टिंग मिळाले आहे. सिंघमच्या आवाजात आपल्याला अनाथ मुलगा 'सिम्बा'ची कहाणी ऐकवली जाते. 'सिम्बा' एक भ्रष्ट आणि निर्दयी माणूस का बनला हे त्यातून सांगितले जाते. सिम्बा तारुण्यात पदार्पण करतो आणि तो पोलीस अधिकारी बनतो. त्याची बदली मिरामार पोलीस स्टेशन होते. येथे त्याच्याआधी तो भ्रष्ट असल्याची ख्याती पोहोचते. येथील लोकल गुंडांकडून तो आपला 'कट' घेण्यात यशस्वी होतो. दरम्यान तो त्याची शेजारी असलेल्या प्रिया (सारा खान) च्या प्रेमात पडतो. याचकाळात त्याच्या कार्यक्षेत्रात एक भीषण गुन्हा घडतो, ज्यामुळे तो एक चांगला पोलीस अधिकारी बनतो आणि आरोपींच्या मागावर निघतो.

फुल मसाला चित्रपट...

रोहित शेट्‌टीच्या चित्रपटामध्ये सर्व गोष्टी कायम लाऊड असतात. तो कायम प्रेक्षकांना फुल मसाला आणि पैसा वसूल चित्रपट देत असतो. सिक्स पॅक असलेला हीरो जो फ्रेमबाहेर आणि आतमध्ये स्लो मोशनमध्ये चालतो, दमदार डायलॉग जे लक्ष वेधून घेतात आणि जुन्या काळातील हीरोंचे अॅक्शन सीन त्याच्या चित्रपटात बघायला मिळत असतात. रोहितचा या गोष्टींत हातखंडा आहे. हे सर्व त्याच्या याही चित्रपटात आहे. चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याचा अंदाज प्रेक्षक सहज बांधू शकतात.

कुठे झाली चुक...

रोहित शेट्टीने बलात्कारासारख्या गंभीर विषयाला उचलून धरले मात्र या विषयाला मसाला चित्रपटाची फोडणी देऊन तो फसला. चित्रपटाचा फर्स्ट हाफ नाटकासारखा वाटतो, पण सेकंड हाफ गती पकडतो, त्यामुळे प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतात.

रणवीच्या अभिनयात दम...
रणवीर सिंहने चित्रपटातील भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रणवीरला स्क्रिनवर बघताना मजा येते. सुरुवातीला एक भ्रष्ट आणि पोलीसांचे काम गांभीर्याने न घेणारा अँग्री मॅनमध्ये कसा बदलतो, हे त्याने अचुक टिपले आहे. त्याच्या अवतीभोवती कलाकारांची तगडी फौज आहे, पण तरीदेखील रणवीरने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

सारा ठरली केवळ शो-पीस
चित्रपटात साराकडे सुंदर दिसणे आणि एका डान्स सिक्वेन्सव्यतिरिक्त करण्यासारखे दुसरे काहीच नाही. तिने हा चित्रपट कोणता विचार करुन स्वीकारला हेच कळत नाही. सोनू सूद डॉनच्या रुपात शोभून दिसला. त्याने भूमिकेला योग्य न्याय दिला. आशुतोष राणा सिम्बाचे हेड कॉन्सटेबल बनले असून काही ठिकाणी त्यांनी दमदार अभिनय केला, तर कुठे ते ओव्हर अॅक्टिंग करताना दिसले.

यशस्वी ठरला नाही रोहित...

अजय देवगणची धमाकेदार एंट्री चित्रपटात बघायला मिळते. अक्षय कुमारचाही कॅमिओदेखील प्रेक्षकांसाठी सरप्राइज पॅकेज आहे. चित्रपटात अक्षयला बघून रोहित सिक्वेलच्या तयारीत असून अक्षय मेन लीडमध्ये असेल, असा अंदाज बांधता येतो. रोहितने सामाजिक संदेश देणारा चित्रपट बनवण्यापेक्षा त्याचा हातखंडा असलेल्या मसाला चित्रपटाकडेच लक्ष दिले असते, तर योग्य ठरले असते, असे हा एकंदरीत चित्रपट बघून वाटते.Simmba movie Review Ranveer Singh and sara ali khan film review

Post a Comment

 
Top