0
चेंबूरच्या सरगम सोसायटीतील इमारतीत गुरुवारी लागलेल्या आगीचे प्रकरण

मुंबई- पाच जणांचा बळी घेणाऱ्या मुंबईतील चेंबूरच्या सरगम सोसायटी आगप्रकरणी इमारत विकासक हेमंत माफराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इमारतीला मुंबई महापालिकेकडून ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्यात आले नव्हते तरी या विकासकाने ही इमारत रहिवाशांना राहण्यासाठी दिली होती. त्याचप्रमाणे इमारतीत आग सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नसल्याची बाब समोर आली आहे.

चेंबूरमधील टिळकनगरमधील सरगम सोसायटीच्या इमारतीच्या ११व्या मजल्यावर लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला होता. संध्याकाळी ८ वाजता एका फ्लॅटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. आग लागल्यानंतर मजल्यावरील एका घरातल्या ख्रिसमस ट्रीने पेट घेतला. या घरातील व्यक्तीने हे झाड गॅलरीत फेकले. त्यामुळे ही आग पसरत गेली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. रात्रीची वेळ असल्याने इमारतीतील लोक घरीच होते. अचानक लागलेल्या आगीमुळे घबराट पसरून ते घरातून बाहेर पळत सुटले. मात्र, आसपास आग पसरल्याने तीन फ्लॅटमधील रहिवाशांना बाहेर पडता आले नाही आणि सुनीता जोशी (७२), भालचंद्र जोशी (७२), सुमन जोशी (८३), तरला गांगर (५२) आणि लक्ष्मीबेन गांगर (८३) या वृद्धांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झाले. भालचंद्र आणि सुमन जोशी पती-पत्नीचा धुरामुळे श्वास घेता न आल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुपारनंतर सर्व मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

अरुंद रस्ते व पार्किंगमुळे वाढत आहेेत बळी
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहे. अंधेरीतील कामगार रुग्णालयातील आगीपासून ते चेंबूरमधील इमारतीला लागलेल्या आगीने २५ हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. पण आगीतील मृतांच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण अरुंद रस्ते आणि रस्त्यांवर पार्क केलेल्या कार असल्याचे समोर आले आहे. चेंबूरमधील आगीने ५ जणांचा बळी घेतला आहे. मृतांमध्ये ४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
Five elderly people were death in a fire in Mumbai building

Post a Comment

 
Top