0
मुंबई : मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी, ९ डिसेंबरला ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी, ९ डिसेंबरला ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा मंदगती (स्लो) मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य- मुख्य मार्ग
कधी-  स.११.१० ते दु.३.४०.
कुठे- मुलुंड ते माटुंगा मंदगती मार्ग
 मुलुंड ते माटुंगा दरम्यान मंदगती मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांत थांबतील. माटुंग्यानंतर त्या पुन्हा मंदगती मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे त्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे मार्ग
कधी- स.११.१० ते दु.३.४०.
कुठे- कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

Post a comment

 
Top