0
नगर जिल्ह्यात टंचाईच्या कालावधीत ग्रामस्थांना मागणीप्रमाणे टँकर मंजुरीचे प्रस्ताव

नगर- नगर जिल्ह्यात टंचाईच्या कालावधीत ग्रामस्थांना मागणीप्रमाणे टँकर मंजुरीचे प्रस्ताव तातडीने सादर करून ते मंजूर करून घ्यावेत, अशी सूचना देतानाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी टंचाईच्या कालावधीत जनतेला दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शुक्रवारी दिले.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातील नादुरुस्त असलेली वीज रोहित्रे तातडीने दुरुस्त करण्याची सूचना विखे यांनी दिली. ० ते १०० हेक्टरपर्यंतच्या लघू पाटबंधारे योजना राबवण्याचे घटनात्मक अधिकार जिल्हा परिषदेला असल्याने शासनाच्या २४ ऑक्टोबर २०१८ च्या परिपत्रकानुसार ना हरकत प्रमाणपत्र जिल्हा परिषदेकडून इतर यंत्रणेला देणे उचित होणार नाही, त्याऐवजी संबंधित यंत्रणेकडून जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून दिल्यास जिल्हा परिषदेमार्फत कामे करण्यात येतील असे सभेत ठरवण्यात आले.

नगर जिल्ह्यात जनावरांची संख्या जास्त असल्याने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने योजनांचा लाभ एकाच लाभार्थ्याला दुबार देण्यात देऊ नये, अशी सूचनाही सभेत करण्यात आली. नगर तालुक्यातील मिरावली पहाड येथे नियमित पाणीपुरवठा होईल याची दक्षता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घ्यावी, अशी सूचनाही संबंधितांना देण्यात आली. टंचाई परिस्थितीत दूषित पाणीपुरवठा होणार नाही, याची दक्षता ग्रामसेवक यांनी घ्यावी, अशी सूचनाही उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली गेली.

सभेसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, सदस्य सुनील गडाख, हर्षदा काकडे, प्रभावती ढाकणे, सुनीता खेडकर, सभेचे सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कार्यकारी अभियंता गिते उपस्थित होते.Shalini Vikhe warn coorporation

Post a comment

 
Top