0
आंबोली घाटात मठ येथील बोवलेकर यांना रस्त्याच्या कडेला चार ते पाच महिन्याचे सांबराचे पिल्लू मिळाले. ते त्यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत आणि त्यांच्या सहकाऱयांच्या ताब्यात दिले. सावंत यांनी ते लागलीच वनविभागाच्या ताब्यात देत त्याला जीवदान दिले.
सोमवारी सकाळी बोवलेकर हे मठ-वेंगुर्ले येथून आंबोलीमार्गे येत असतांना त्यांना घाटात रस्त्याकडेला एक जिवंत चार ते पाच महिन्याचे सांबराचे पिल्लू दिसले. त्याचा पाय पॅक्चर असल्याने त्याला चालता येत नव्हते. ते पिल्लू त्यांनी आंबोली पोलिसांच्या ताब्यात दिले.
विश्वास सावंत यांनी सांबराच्या पिल्लाची अवस्था पाहून त्याला लागलीच वनविभागाच्या ताब्यात दिले. यावेळी वनविभागाचे किरण पाटील, गाडेकर, बाळा गावडे, अशोक गावडे उपस्थित होते. त्यांनी त्या पिल्लावर उपचार करून तेथील वनविभागाच्या अधिवासात सोडले.

Post a Comment

 
Top