0
मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने राज यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लाेष केला.

इगतपुरी- रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना नोकरी प्राधान्य मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर २००८ मध्ये मनसेने केलेल्या आंदोलन प्रकरणात राज ठाकरे यांना इगतपुरीच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इगतपुरीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने राज यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लाेष केला.

इगतपुरीत एका परप्रांतीय हॉटेलवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याबाबत के. आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील सहा आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता झाली आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांचे नाव आरोपी म्हणून खटल्यात दाखल हाेते.

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना भेटणार
मनसेच्या बांधबदिस्तीसाठी पाच दिवसीय नाशिक दाैऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांचे जाेरदार स्वागत मंगळवारी झाले. इगतपुरी येथे तीन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक, न्यायालयीन सुनावणी आटाेपून दुपारी दाखल झालेल्या ठाकरे यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची भेट घेणे पसंत केले. बुधवारी ते कळवण, सटाणा व चांदवड या तालुक्यातील कांदा उत्पादकांची भेट घेवून चर्चा करणार आहे. देशांतर्गत राजकारणात शेतकरी व कांदा हे दाेन्ही मुद्दे चांगलेच तापले असून ठाकरे यांनाही कांद्यात रस वाटू लागल्याची चर्चा अाहे.
Raj Thackeray gets bail in protests

Post a comment

 
Top