0
तिने हा सामना 62 मिनिटांत 21-19, 21-17 ने जिंकला आहे.

ग्वांगझू - भारतीय शटलर पीव्ही सिंधूने बीडब्लूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचा खिताब मिळवला आहे. तिने शेवटच्या सामन्यात जपानची नोझोमी ओकुहारा हिला पराभूत करून गोल्ड मिळवला आहे. हा खिताब जिंकणारी सिंधू भारताची पहिलीच महिला बॅडमिंटनपटू बनली आहे. तिने हा सामना 62 मिनिटांत 21-19, 21-17 ने जिंकला आहे. यावर्षी सिंधूने मिळवलेले हे पहिलेच गोल्ड आहे.


दोन्ही खेळाडू समोरासमोर येण्याची ही 13 वी वेळ होती. आतापर्यंत दोघांमध्ये झालेल्या 13 सामन्यांपैकी सिंधूला 7 विजय मिळाले आहेत. तर 6 सामने ओकुहाराने जिंकले आहेत. यापूर्वी सेमीफायनलमध्ये सिंधूने थायलंडच्या रतचनोक इंतानोनला 21-16, 25-23 ने पराभूत केले. सिंधू रियो ऑलिम्पिक 2016 च्या फायनलमध्ये पराभूत झाली होती. तर याच वर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये सुद्धा तिला यश मिळाले नाही. दोन्ही जागतिक स्पर्धांच्या फायनलमध्ये ती उपविजेती ठरली. त्यामुळे, चीनमध्ये बीडब्लूएफ वर्ल्ड टूर चॅम्पियनशिप जिंकून तिने यावर्षी आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
PV Sindhu won final of World Tour Finals

Post a Comment

 
Top