0

महाभारत युद्धामध्ये दुर्योधनाला भीमने पराभूत केले तेव्हा दुर्योधन जमिनीवर पडल्या-पडल्या तीन बोटं दाखवून काहीतरी बोलण्याच

महाभारतामध्ये दुर्योधनाने खूप चुका केल्या, ज्यामुळे महाभारत युद्ध झाले आणि या युद्धामध्ये संपूर्ण कौरव वंशाचा नाश झाला. एका प्रसंगानुसार जेव्हा युद्ध समाप्त झाले आणि दुर्योधनाला भीमने पराभूत केले तेव्हा तो जमिनीवर पडल्या-पडल्या तीन बोटं दाखवून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. दुर्योधन खूप जखमी झाला होता आणि त्यामुळे त्याला स्पष्ट बोलणे जमत नव्हते. हे पाहून श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेले आणि त्याच्याशी चर्चा केली. तेव्हा दुर्योधनाने सांगितले की, त्याने तीन खूप मोठ्या चुका केल्या, ज्यामुळे तो युद्धात पराभूत झाला.

पहिली चूक
दुर्योधनाने श्रीकृष्णाला सांगितलेली पहिली चूक, युद्धामध्ये त्याने स्वयं नारायण म्हणजे श्रीकृष्णाची नाही तर त्यांच्या नारायणी सैन्याची मागणी केली.
दुसरी चूक
दुर्योधनाने सांगितलेली दुसरी चूक म्हणजे, आई गांधारीने त्याला नग्न अवस्थेमध्ये भेटण्यासाठी बोलावले असताना तो कंबरेखाली केळीचे पान लावून गेला. जर नग्न अवस्थेत गेला असता तर पूर्ण शरीर वज्रासमान झाले असते. कोणीही त्याला पराभूत करू शकले नसते.
तिसरी चूक
दुर्योधनानुसार त्याची तिसरी चूक म्हणजे तो युद्धामध्ये सर्वात शेवटी पुढे आला. तो युद्धाच्या सुरुवातीलाच पुढे आला असता तर कौरव वंशाचा नाश झाला नसता.

दुर्योधनाच्या या गोष्टी ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की, 'तुझ्या पराभवाचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तुझे अधर्मी आचरण. तू भरसभेत आपल्या कुलवधुचे वस्त्रहरण केले. तू जीवनात असे अनेक अधर्म केले, ज्यामुळे तुझा पराभव झाला.duryodhana three mistake in mahabharat yuddha

Post a Comment

 
Top