0
एका खास फॉर्मूलाच्या मदतीने बिल गेट्स आणि त्यांची पत्नी करतात मुलांचे संगोपन

नवी दिल्ली- जगातील सर्वात धनाढ्य उद्योजक बिल गेट्स यांनी कुटुंबियांचे पालन कसे केले जाते याच्या काही खास टीप्स दिल्या. एका इंटरव्हिव्युमध्ये त्यांनी सांगितले की, कशाप्रकारे ते आणि त्यांची पत्नी मुलांचे संगोपन करतात. त्यासाठी त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा उपाय शोधून काढला आहे. त्यांच्या मते, प्रेम आणि लॉजिकचा फॉर्मूला वापरुन त्यांना चांगले आई-वडील होण्याची संधी मिळाली. चला तर पाहुया बिल गेट्स यांनी सांगितलेल्या खास टीप्स...


मेलिंडा गेट्स करतात मुलांचे संगोपन
> बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव जेनिफर, मुलाचे नाव रोरी जॉन तर सर्वात लहान मुलीचे नाव फोबे एडेल गेट्स आहे. जेनिफर स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असून रोरी जॉन लेकसाइट स्कूलमध्ये शिकत आहे. बिल गेट्स यांच्या घरात पत्नी मेलिंडा या तिन्ही मुलांचे संगोपन करतात. एका इंटरव्हिव्युमध्ये बिल गेट्स यांनी खुलासा केला होता की मुलांचा 80 टक्के सांभाळ करण्यात त्यांची पत्नी मेलिंडाच करतात.


प्रेम आणि लॉजिक पॅरेंटींग मॉडेलचा करतात वापर
> बिल गेट्स यांनी सांगितले की, ते आणि त्यांची पत्नी 1970 पासून प्रेम आणि लॉजिक पॅरेंटींग मॉडेलचा वापर करतात. हा फॉर्मूला सायकोलॉजिस्ट, सायकेट्रीक आणि स्कुल अॅडमिनिस्ट्रेशन यांनी मिळून तयार केला आहे. या फॉर्मूल्यात इमोशनल कंट्रोल, इमोशनल रिअॅक्शनवर ताबा मिळवणे, न ओरडणे यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात.
Bill gates special news about parenting

Post a comment

 
Top