0
वस्तुसंग्रहालयाची जागा, आतील मांडणी व प्रकाशयोजना अतिशय उत्तम असून ती प्राचीन वस्तूंना पुरक आहे. त्याचबरोबर वेगवेगळे मौल्यवान खडे, हिरे माणके पाचू वापरून केलेली कलाकुसर अप्रतिम आहे, असे मत अमेरिका येथील वनस्पती शास्त्र संशोधन विभागाच्या कार्यकारी संचालक ऍगरहापर शिंडी यांनी व्यक्त केले.
  येथील जगप्रसिद्ध भवानी कला वस्तुसंग्रहालयाला त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी निसर्ग बायोटेक कंपनीचे कार्यकारी संचालक कृषी अग्रोटेक कंपनीचे शिंदे, संग्रहालय सहाय्यक अभिरक्षक उदय सुर्वे उपस्थित होते.
   शिंडी यांनी पुढे म्हटले की, भरतकाम केलेले पेंटिंग इतके उच्च दर्जाचे आहे की जवळ जाऊन पाहिल्यानंतर ते भरतकाम आहे हे समजून येते. सोने, चांदी, तांबे यांची नाणी अतिशय मोलाची व प्रभाव टाकणारी आहेत. तसेच कलाप्रेमी राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी कल्पक दृष्टीकोन ठेवून जपलेला हा कलाकृतीचा अनमोल खजिना प्रत्येकांनी एकदा पाहिलाच पाहिजे. संग्रहालय कर्मचारी यांनी सुध्दा या प्राचीन वस्तूंची अतिशय काळजीपूर्वक देखभाल केली आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले. संग्रहालय उपअभिरक्षक उदय सुर्वे यांनी स्वागत करुन संग्रहालयाची माहिती दिली

Post a Comment

 
Top