आनंद एल रायने दिला आशिषला चित्रपट पहिला ब्रेक..
एंटरटेन्मेंट डेस्क : शाहरुख खानचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'झिरो' मध्ये यूपीच्या मैनपुरी जिल्ह्यातील आशीष सिंह शाहरुखचा बॉडी डबल बनला आहे. या चित्रपटातून आशीषला जी फीस मिळाली आहे, त्यातून तो आपले घर बनवणार आहे. आशीष खूप अडथळ्यांचा सामना करत चित्रपटात आला आहे. आता चित्रपटातून मिळालेल्या पैशातून तो त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.
असे होते आशिषचे पूर्वीचे आयुष्य..
आशीषने सांगितले, "माझे लहानपणीचे स्वप्न साकार झाले आहे. मी गावात रामलीला करायचो. तेव्हाच निर्णय घेतला कि अभिनय क्षेत्रात यायचे. शालेय शिक्षणासाठी मी दिल्लीमध्ये आलो. तिथे कित्येकवर्ष नुक्कड नाटक केले. मुंबईत पोहोचलो तर पहिल्यांदा आनंद एल रायसोबत एयरपोर्टवर भेटलो. मग एका कास्टिंग कोऑर्डिनेटरद्वारे त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. फायनली त्यांनी 'झिरो' मध्ये मला पहिला ब्रेक दिला."
चित्रपटात काम केल्याच्या अनुभवाविषयी आशिष सांगतो, "चित्रपटात शाहरुखच्या कॅरेक्टर स्किनमध्ये जाण्यासाठी मला त्याच्यासारखे शाही आयुष्य जगता आले. मन्नतवरील वातावरणाचाही अनुभव घेता आला. आनंद आणि शाहरुख माझ्या कामाने इतके खुश झाले की त्यांनी मला त्यांच्या पुढील चित्रपटातही घेण्याचे वाचन दिले आहे."
आशीषचे वडील दिल्लीमध्ये सिक्योरिटी गार्ड आहेत. मैनपुरी जिल्ह्याच्या जासमाई गावात त्यांची जमीन आहे. आपला खर्च भागवण्यासाठी आशीषने कधीच घरून पैसे नाही घेतले. नुक्कड नाटकात काम करत असल्यामुळे घरच्यांना काळजी वाटत होती की, मुलगा आयुष्यात पुढे काय करेल. आता चित्रपटातून जे काही पैसे आले आहेत ते आशिष घरी पाठवत आहे.

Post a Comment