0

संसद अधिवेशन : काँग्रेस, तृणमूल, शिवसेना, टीडीपीने पोस्टर फडकावले

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ केल्याने सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. बुधवारी लोकसभेत राम मंदिर, रफाल, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीवरून शिवसेना, काँग्रेस तसेच टीडीपीच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन पोस्टर झळकवले.

रफाल सौद्यातील घोटाळ्याचा आरोप करून संयुक्त संसदीय समितीद्वारे (जेपीसी) त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार राम मंदिर बनवण्याच्या मागणीवर अडून होते. तृणमूलने राज्यसभेत आरबीआय व इतर स्वायत्त संस्थांच्या स्वातंत्र्यावर संकटावर चर्चेची नोटीस दिली. लोकसभेत घोषणाबाजी सुरू असतानाच सरकारने बंधारे सुरक्षा विधेयक-२०१८ ला सभागृहाच्या पटलावर मांडले. सभागृहातील गदारोळ थांबत नसल्यामुळे लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना गदारोळामुळे कामकाज तहकूब करावे लागले.

पराभवाचे शल्य की संसद ठप्प झाल्याचे ? 
बुधवारी लोकसभेत खासदार अध्यक्षांसमोर जाऊन पोस्टर फडकावत होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात होते. ते विरोधी खासदारांचा गदारोळ शांतपणे बसून पाहत होते.

राज्यसभेत दिव्यांगसंबंधी दुरुस्ती विधेयक-२०१८ पारित 
राज्यसभेत अण्णाद्रमुख व द्रमुकच्या खासदारांनी कावेरी नदीमुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. राज्यसभेचे सभापती वेंकया नायडू म्हणाले, या प्रकरणात अनेक पक्षांकडून नोटीस मिळाली आहे. त्यावर सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले . या दरम्यान दिव्यांगांसबंधी दुरुस्ती विधेयक-२०१८ पारित जाले. या विधेयकानुसार दिव्यांग विभागाच्या स्थापनेबरोबरच अध्यक्ष पदाची नियुक्ती करण्याचाही समावेश केला गेला आहे.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत गदारोळ; अध्यक्षांनी केले सहकार्याचे अावाहन 
लोकसभा अध्यक्ष महाजन यांनी प्रश्नोत्तराला सुरूवात केली. तेव्हा काँग्रेस, शिवसेना व अण्णाद्रमुकच्या सदस्य घोषणाबाजी करतच अध्यक्षांच्या आसनासमोर आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. विविध पक्षांचे सदस्य हातात पोस्टर फडकवत होते. हिवाळी अधिवेशन सरकारचे अखेरचे अधिवेशन आहे. अध्यक्षांनी सहकार्य करण्याचे गोंधळ करणाऱ्या खासदारांना आवाहन केले. त्याचा उपयोग झाला नाही.
Parliament work stop from 2 days

Post a comment

 
Top