0
  • Raj Thackeray Speech to north indians in mahapanchayat at Kandivali Mumbaiमुंबई - आपण फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांतील संघर्षालाही बळी पडता, ही बाब तुम्हाला स्वत:ला खटकत नाही का, आपल्या स्वाभिमानाला त्यामुळे धक्का पोहोचत नाही का, असा भावनिक सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. तुमच्या राज्यात रोजगार नाही, म्हणून इथे येता हे मी मान्य करतो. मात्र मराठी राज्यातल्या बेरोजगार तरुणांना डावलून जेव्हा तुम्हाला नोकरी मिळते, तेव्हा संघर्ष अटळच आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. कुणाचा दुस्वास करणे माझा हेतू नाही, उलट असा दुस्वास होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी ही इच्छा असल्याचे राज म्हणाले. मुंबईत कांदिवली परिसरात आयोजित उत्तर भारतीय संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
   ... म्हणून हिंदीत भाषण 
   राज ठाकरे म्हणाले की, यापूर्वी मी गुजराती आणि मारवाडी समाजाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात मराठीतून भाषण केले. मात्र उत्तरेतल्या राज्यांमधील लोकांना काही बाबी सांगायच्या आहेत म्हणून हिंदीतून भाषण करत आहे. स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे, उत्तर भारतीयांबाबतची भूमिका मांडण्यासाठी या व्यासपीठावर आलो आहे.
   सुमारे आठ दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध उत्तर भारतीय यांच्यात झालेल्या संघर्षाबद्दल बोलताना राज म्हणाले की, त्यावेळी जे घडले त्याचे प्रसिद्धी माध्यमांद्वारे राष्ट्रीय स्तरावर चुकीचे चित्र उभे केले गेले. रवि नाईक या गोव्याच्या एका मंत्र्याने बिहार ते गोवा अशी रेल्वे सुरू करण्यास विरोध करत भिकाऱ्यांची ट्रेन आम्हाला नको, असे वक्तव्य केले. आसाममध्ये तर उत्तर भारतीयांचे खून झालेत. मात्र त्यावर कुणीही काहीही बोलले नाही, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
   कल्याण येथील रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य मिळाले पाहिजे, ही भूमिका घेऊन महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रेल्वे अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यांना ज्या भाषेत उत्तर मिळाले ती भाषा सहन न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी परिक्षार्थींना मारहाण केली. आमच्या जागी तुम्ही असतात तर तुम्हीही तेच केले असते, असे राज म्हणाले. राज ठाकरेंना दोष देण्याऐवजी जरा उत्तर भारतीय समाजानेही थोडे आत्मपरिक्षण केल्यास संघर्षच होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
   स्थलांतर कायद्याचा अभ्यास करा 
   परप्रांतियांच्या विरोधी भुमिका घेतल्याने मी संविधानाचा अपमान करत असल्याचा आरोप माझ्यावर केला जातो, असे सांगत राज यांनी आंतरराज्यीय स्थलांतर कायद्याचा नीट अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. या देशात कुणीही कुठेही राहू शकतो, असा दावा केला जातो. मात्र त्यांनी हा कायदा नीटपणे वाचलेला नाही. कारण या कायद्यानुसार कुठल्याही राज्यात जाताना आपण या राज्यात का येत आहोत, कुठे रोजगार करणार आहोत, किती दिवस वास्तव्य आहे, अशी संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी लागते. मात्र त्याचे नीट पालन होत नसल्याने असे आरोप होत असल्याचा खुलासा त्यांनी केला.
   उत्तरेत उद्योग सुलभ संस्कृती का निर्माण झाली नाही? : आमच्या राज्यात उद्योग येतात कारण आम्ही इथे उद्योग सुलभ संस्कृती आणि पोषक वातावरण तयार केले. उत्तरेतील राज्यात तशी संस्कृती का निर्माण होऊ शकत नाही, ही बाब उत्तर भारतातील राजकीय नेत्यांना तुम्ही विचारावी, असा सल्लाही त्यांनी उत्तरेतील लोकांना दिला.
   उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी
   राज यांच्या भाषणानंतर उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना मुंबई व महाराष्ट्रात प्रवेशबंदी करण्यात येत असल्याची घोषणा उत्तर भारतीय महापंचायत समितीने केली. जोपर्यंत त्या राज्यांत रोजगार निर्माण होत नाही तोवर या दोन्ही राज्यांतील नेत्यांना, विशेषत: आमदार-खासदाराला महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे समितीने म्हटले आहे.
   इंदिरा गांधी, राजेंद्र प्रसाद यांचा संदर्भ : आपण जे बोलतो तेच यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अन् माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले असल्याचा दावाही राज यांनी केला. उद्या बिहार, उत्तर प्रदेशात एखादा उद्योग गेला तर त्यातील नोकऱ्या तेथील तरुणांना दिल्या जाव्यात, अशी माझी भूमिका आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये रोजगार उपलब्ध होईल, असे उद्योग आणले नाहीत हे तेथील राजकीय नेत्यांचे हे अपयश आहे, असे ते म्हणाले.
   ... आणि परराज्यांतील लोकांचे प्रमाण वाढले
   झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याची जी योजना १९९५ मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केली, त्यानंतर परराज्यातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढल्याचे ते म्हणाले. परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आपले विचार स्पष्ट असून ज्या प्रदेशात रोजगारासाठी किंवा कायम वास्तव्यासाठी आपण जाता तिथली संस्कृती आणि भाषा आपण स्वीकारलीच पाहिजे. ती स्वीकारली नाही तर संघर्ष होणारच. शेवटी प्रत्येक शहराची एक क्षमता असते, त्यापेक्षा अधिक गर्दी झाल्यास संपूर्ण व्यवस्था कोलमडणार. आता तुम्हीही आपल्या लोकांना मुंबईत येऊ नका, असे सांगितले पाहिजे.
   { राज यांनी मेळाव्यात उत्तर भारतीय समुदायासमोर हिंदीतून भाषण केले.
   { मेरे भाइयो और बहनो..म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी स्वागत केले.
   { काशीच्या ३० ब्राह्मणांच्या शंखध्वनीने आणि मंत्रोच्चारात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
  मुंबई - आपण फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांतील संघर्षालाही बळी पडता, ही बाब तुम्हाला स्वत:ला खटकत नाही का, आपल्या स्वाभिमानाला त्यामुळे धक्का पोहोचत नाही का, असा भावनिक सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. तुमच्या राज्यात रोजगार नाही, म्हणून इथे येता हे मी मान्य करतो. मात्र मराठी राज्यातल्या बेरोजगार तरुणांना डावलून जेव्हा तुम्हाला नोकरी मिळते, तेव्हा संघर्ष अटळच आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. कुणाचा दुस्वास करणे माझा हेतू नाही, उलट असा दुस्वास होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी ही इच्छा असल्याचे राज म्हणाले. मुंबईत कांदिवली परिसरात आयोजित उत्तर भारतीय संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
  ... म्हणून हिंदीत भाषण 
  राज ठाकरे म्हणाले की, यापूर्वी मी गुजराती आणि मारवाडी समाजाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात मराठीतून भाषण केले. मात्र उत्तरेतल्या राज्यांमधील लोकांना काही बाबी सांगायच्या आहेत म्हणून हिंदीतून भाषण करत आहे. स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे, उत्तर भारतीयांबाबतची भूमिका मांडण्यासाठी या व्यासपीठावर आलो आहे.
  सुमारे आठ दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध उत्तर भारतीय यांच्यात झालेल्या संघर्षाबद्दल बोलताना राज म्हणाले की, त्यावेळी जे घडले त्याचे प्रसिद्धी माध्यमांद्वारे राष्ट्रीय स्तरावर चुकीचे चित्र उभे केले गेले. रवि नाईक या गोव्याच्या एका मंत्र्याने बिहार ते गोवा अशी रेल्वे सुरू करण्यास विरोध करत भिकाऱ्यांची ट्रेन आम्हाला नको, असे वक्तव्य केले. आसाममध्ये तर उत्तर भारतीयांचे खून झालेत. मात्र त्यावर कुणीही काहीही बोलले नाही, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
  कल्याण येथील रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य मिळाले पाहिजे, ही भूमिका घेऊन महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रेल्वे अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यांना ज्या भाषेत उत्तर मिळाले ती भाषा सहन न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी परिक्षार्थींना मारहाण केली. आमच्या जागी तुम्ही असतात तर तुम्हीही तेच केले असते, असे राज म्हणाले. राज ठाकरेंना दोष देण्याऐवजी जरा उत्तर भारतीय समाजानेही थोडे आत्मपरिक्षण केल्यास संघर्षच होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
  स्थलांतर कायद्याचा अभ्यास करा 
  परप्रांतियांच्या विरोधी भुमिका घेतल्याने मी संविधानाचा अपमान करत असल्याचा आरोप माझ्यावर केला जातो, असे सांगत राज यांनी आंतरराज्यीय स्थलांतर कायद्याचा नीट अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. या देशात कुणीही कुठेही राहू शकतो, असा दावा केला जातो. मात्र त्यांनी हा कायदा नीटपणे वाचलेला नाही. कारण या कायद्यानुसार कुठल्याही राज्यात जाताना आपण या राज्यात का येत आहोत, कुठे रोजगार करणार आहोत, किती दिवस वास्तव्य आहे, अशी संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी लागते. मात्र त्याचे नीट पालन होत नसल्याने असे आरोप होत असल्याचा खुलासा त्यांनी केला.
  उत्तरेत उद्योग सुलभ संस्कृती का निर्माण झाली नाही? : आमच्या राज्यात उद्योग येतात कारण आम्ही इथे उद्योग सुलभ संस्कृती आणि पोषक वातावरण तयार केले. उत्तरेतील राज्यात तशी संस्कृती का निर्माण होऊ शकत नाही, ही बाब उत्तर भारतातील राजकीय नेत्यांना तुम्ही विचारावी, असा सल्लाही त्यांनी उत्तरेतील लोकांना दिला.
  उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी
  राज यांच्या भाषणानंतर उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना मुंबई व महाराष्ट्रात प्रवेशबंदी करण्यात येत असल्याची घोषणा उत्तर भारतीय महापंचायत समितीने केली. जोपर्यंत त्या राज्यांत रोजगार निर्माण होत नाही तोवर या दोन्ही राज्यांतील नेत्यांना, विशेषत: आमदार-खासदाराला महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे समितीने म्हटले आहे.
  इंदिरा गांधी, राजेंद्र प्रसाद यांचा संदर्भ : आपण जे बोलतो तेच यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अन् माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले असल्याचा दावाही राज यांनी केला. उद्या बिहार, उत्तर प्रदेशात एखादा उद्योग गेला तर त्यातील नोकऱ्या तेथील तरुणांना दिल्या जाव्यात, अशी माझी भूमिका आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये रोजगार उपलब्ध होईल, असे उद्योग आणले नाहीत हे तेथील राजकीय नेत्यांचे हे अपयश आहे, असे ते म्हणाले.
  ... आणि परराज्यांतील लोकांचे प्रमाण वाढले
  झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याची जी योजना १९९५ मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केली, त्यानंतर परराज्यातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढल्याचे ते म्हणाले. परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आपले विचार स्पष्ट असून ज्या प्रदेशात रोजगारासाठी किंवा कायम वास्तव्यासाठी आपण जाता तिथली संस्कृती आणि भाषा आपण स्वीकारलीच पाहिजे. ती स्वीकारली नाही तर संघर्ष होणारच. शेवटी प्रत्येक शहराची एक क्षमता असते, त्यापेक्षा अधिक गर्दी झाल्यास संपूर्ण व्यवस्था कोलमडणार. आता तुम्हीही आपल्या लोकांना मुंबईत येऊ नका, असे सांगितले पाहिजे.
  { राज यांनी मेळाव्यात उत्तर भारतीय समुदायासमोर हिंदीतून भाषण केले.
  { मेरे भाइयो और बहनो..म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी स्वागत केले.
  { काशीच्या ३० ब्राह्मणांच्या शंखध्वनीने आणि मंत्रोच्चारात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Post a Comment

Top