0
यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने तीन एकरमधून जेमतेम दोन क्विंटल कपाशीचे उत्पन्न आल्याने संपवले जीवन.

धुळे- शेतातील झाडाला आईच्या साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील दलवाडे येथे शुक्रवारी उघडकीस आली.नारोत्तम गुलाब कापूरे (२५) असे तरुण शेतकऱ्याचे नाव असून तो अविवाहित होता. गुलाब कापूरे यांच्या नावाने तीन एकर शेती आहे.

नारोत्तमच्या वडिलांनी बँकेतून १६ हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. तसेच एका खासगी कंपनीकडे घर गहाण ठेऊन घर बांधण्यासह शेतीसाठी दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. चांगले उत्पादन आल्यावर कर्ज फेडण्याचे नियोजन होते. मात्र, यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने तीन एकरमधून जेमतेम दोन क्विंटल कपाशीचे उत्पन्न आले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत नारोत्तम होता. तो शुक्रवारी दुपारी शेतात जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर गेला. त्याने सोबत आईची जुनी साडी नेली होती. शिंदखेडा विरदेल रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेताजवळ त्याने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.Suicide case in Dhule

Post a Comment

 
Top