0
गंभीर आजारामुळे कॅनडातील रुग्णालयात दाखल आहेत कादर खान

एंटरटेन्मेंट डेस्कः ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाच्या वृत्ताचे त्यांचा मुलगा सरफराज खानने खंडन केले आहे. निधनाचे वृत्त ही एक अफवा असल्याचे त्याने सांगितले आहे. सरफराजने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांवर कॅनडातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहे. तो म्हणाला, 'ही बातमी खोटी असून केवळ एक अफवा आहे. माझ्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.' रविवारी रात्री सोशल मीडियावर कादर खान यांच्या निधनाचे वृत्त पसरले होते. ही बातमी कळताच चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली द्यायला सुरुवात केली होती. कादर खान यांच्यावर सध्या कॅनडातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डरने पीडित आहेत कादर खान...
कादर खान यांना BiPAP व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डरमुळे त्यांच्या मेंदुने काम करणे बंद केले आहे.


अमिताभ बच्चन यांनी केली प्रार्थना... 
अमिताभ बच्चन यांना कादर खान यांच्या आजारपणाबद्दल कळल्यानंतर त्यांनी ट्वीटरवर मेसेज लिहून त्यांच्या दीर्घायुषासाठी प्रार्थना केली. बिग बींनी कादर खान यांचा एक फोटो शेअर करुन लिहिले, "कादर खान... प्रचंड प्रतिभा असलेले अभिनेते आणि लेखक. आजारी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या सुखरूपतेसाठी मी प्रार्थना करतो. मी त्यांना मंचावर परफॉर्म करताना पहिले आहे, माझ्या चित्रपटांसाठी त्यांनी जबरदस्त रायटिंग केले आहे. ते गणित शिकवायचे, हे क्वचितच लोकांना ठाऊक असावे.'


दीर्घ काळापासून कॅनडात आहेत कादर खान
कादर खान गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडा येथे त्यांच्या मुलासोबत वास्तव्याला आहेत. येथे त्यांचा मुलगा सरफराज आणि सून शाइस्ता वास्तव्याला आहेत. सरफराजने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने बाइपेप व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

काय असते पीएपी
प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी (पीएसपी) एक असामान्य मेंदुचा आजार असून तो शरीराची हालचाल, बोलणे आणि दृष्टीला प्रभावित करतो. हा आजार मेंदुतील सर्व नर्व सेल्स नष्ट करण्याचे कारण ठरतो.


अशी आहे कादर खान यांची प्रकृती 
बातम्यांनुसार, कादर खान क्वचितच शुद्धीवर येत आहेत. त्यांनी बोलणे बंद केले आहे. निमोनियाचे लक्षणही आढळून आले आहे. कादर खान यांचा मुलगा आणि सून त्यांच्या उपचारांमध्ये कुठलीही कसर शिल्लक सोडत नाहीयेत. पण आता कादर साहेबांनी प्रकृती अतिशय नाजुक झाली आहे.


गेल्या वर्षी झाली होती शस्त्रक्रिया 

कादर खान यांचा मुलगा सरफराजने सांगितल्यानुसार, कादर साहेबांवर 2017 मध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.Veteran Actor Kader Khan Son Dismisses Reports Of His Death Rumors

Post a Comment

 
Top