0

कावळ्याने हंसाला पाहिल्यानंतर त्याला वाटले जगातील सर्वात सुंदर पक्षी हाच आहे, हंसाने सांगितले सर्वात सुंदर पक्षी पोपट आहे.

गावाजवळील मोठ्या झाडावर एक कावळा राहत होता आणि त्याला नेहमी वाटायचे की देवाने त्याला या जगातील सर्वात विद्रुप पक्षी बनवले आहे. एकदा तो तलावाजवळ पाणी पिण्यासाठी थांबला आणि तेथे त्यांला हंस दिसला. त्याने विचार केला की, मी किती काळा आणि हंस किती सुंदर आहे. कदाचित हाच जगातील सर्वात सुंदर पक्षी असेल.कावळा हंसाकडे गेला आणि विचारले- तू जगातील सर्वात सुंदर पक्षी आहेस का? हंस म्हणाला- मलाही असेच वाटत होते की, मी जगातील सर्वात सुदंर पक्षी आहे परंतु तोपर्यंत मी पोपट पाहिलेला नव्हता. पोपटाला पाहिल्यानंतर मला असे वाटते की पोपटच जगातील सर्वात सुंदर पक्षी आहे.


कावळा पोपटाकडे गेला आणि विचारले- तू जगातील सर्वात सुंदर पक्षी आहेस का? पोपट म्हणाला- आधी मलाही असेच वाटत होते की मी सर्वात सुंदर पक्षी आहे. परंतु जेव्हा मी मोराला पाहिले तेव्हापासून मला मोरच जगातील सुंदर पक्षी असावा असे वाटते.


कावळा प्राणिसंग्रहालयातील मोराकडे गेला आणि पाहिले की, शेकडो लोक मोराला पाहण्यासाठी आले होते. कावळा मोराजवळ गेला आणि विचारले- तूच जगातील सर्वात सुंदर पक्षी आहेस का? यामुळेच तुला पाहण्यासाठी एवढे लोक येतात.


मोराने सांगितले- मी नेहमी असाच विचार करत होतो की, जगात सर्वात सुंदर पक्षी मीच आहे. परंतु याच सौंदर्यामुळे मला येथे पिंजऱ्यात ठेवले आहे. मी आनंदी नाहीये आणि आता मला असे वाटते की, मीपण कावळा असतो तर आज आकाशात उंच-उंच भरारी घेतली असती.


लाईफ मॅनेजमेंट
आपले आयुष्यही काहीसे असे झाले आहे. आपल्यालाही असे वाटते की इतर लोक आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत आणि यामुळे आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. जगातील प्रत्येक व्यक्तीकडे इतर व्यक्तीच्या तुलनेत काही गोष्टी कमी किंवा जास्त असणारच, यामुळे या जगातील सर्वात सुखी व्यक्ती तोच आहे जो आहे त्यामध्ये संतुष्ट राहतो.Motivational Story in Marathi

Post a comment

 
Top