गानकोकिळा लता मंगेशकर यांनी खुद्द ट्विट करून आपली तब्येत ठणठणीत असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर लता यांच्या तब्येतीबद्दल अफवा पसरली होती. त्यात, लता मंगेशकर यांची प्रकृती अस्वस्थ असून त्या हॉस्पिटलमध्ये असल्याचे म्हटले होते. परंतु, लता यांनी त्या सर्व अफवा असून माझी तब्येत चांगली असल्याचे म्हटले आहे.
लता यांनी १४ डिसेंबर रोजी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, 'नमस्कार, माझ्या तब्येतीविषयी अफवा पसरत आहेत. परंतु त्यावर विश्वास ठेऊ नका. माझी तब्येत ठणठणीत आहे. मी माझ्या घरात आहे.'
लता यांच्या टि्वटनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.
याआधीही लता मंगेशकर यांच्याबद्दल अफवा पसरली होती की, त्या संगीतातून निवृत्ती घेणार आहेत. तेव्हाही त्यांनी स्पष्ट केलं होतं की 'मी कधीच गाणं सोडणार नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गातच राहणार आहे.'
'बडी माँ' (१९४५) या चित्रपटातील 'तुम माँ हो बडी माँ' हे गाणे लता यांनी गायले होते. हे त्यांचे पहिले गाणे होते. २००९ मध्ये 'जेल' या चित्रपटातील ;दाता सुन ले; हे गाणे त्यांनी गायले होते.

Post a Comment