पंतप्रधान झाले तेव्हापासून मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही.
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्यावर लावलेला सर्वात शांत आणि कमी बोलणारे पंतप्रधान असा ठपका खोडून काढण्याचा प्रयत्न केला. सोबतच, त्यांनी पीएम नरेंद्र मोदींना देखील चिमटा घेतला. पीएम मोदींप्रमाणे आपण कधीही मीडियाला घाबरलेलो नाही. उलट आपण माध्यमांना नेहमीच मोकळ्यापणे सामोरे गेलो आहोत. त्यामुळे, मला नेहमीच शांत राहणारा पंतप्रधान म्हणणे चुकीचे आहे असे मनमोहन सिंग म्हणाले आहेत. माजी पंतप्रधानांनी हे विधान आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या आयुष्याचा प्रवास, 10 वर्षे पंतप्रधान पदावर असताना अनुभव आणि एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी या पुस्तकात आपला अनुभव मांडला आहे. हे पुस्तक 5 भागांमध्ये प्रकाशित होत आहे.
काय म्हणाले मनमोहन सिंग?
माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुस्तक Changing India चा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले, "मी एक शांत आणि गप्प राहणारा पंतप्रधान होतो असे लोक म्हणतात. परंतु, मी मीडियाला घाबरणारा पंतप्रधान कधीच नव्हतो. मी नेहमीच पत्रकारांच्या भेटी घेत होतो. प्रत्येक परराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मी पत्रकार परिषद घेतली होती."
पीएम मोदींनी घेतली नाही एकही पत्रकार परिषद...
उल्लेखनीय बाब म्हणजे, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. या मुद्द्यावर विरोधकांनी त्यांना अनेकवेळा टीका केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नुकतेच म्हणाले होते, की एकदा पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न कराच. कारण, लोक जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतात ती मजा काही वेगळीच असते.

Post a Comment