0
एक असतो निरसर्गाचा नियम जो बदलत नाही, आणि एक असतो मानवाने बनवलेला नियम जो नेहमी बदलत राहतो.

नॅशनल डेस्क- भारताचा नागरिक म्हणून मी काही अशा नियमांबद्दल सांगणार आहे जे काही खास परिस्थीत वापरले जातात. या नियमांना कुठेही शोधु नका कारण हे नियम तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणाल नाहीयेत. हे असे नियम आहेत ज्यांना भारतातील लोकांनी आपल्या सोयींसाठी बनवले आहे.

1. एका गाडीत अॅडजस्ट होण्याचा नियम. गाडीत जागा नसताना देखील लोक अॅडजस्ट करून बसतात.

2. दारू प्यायला बसल्यावर त्यात जर एखादा न पिणारा असेल तर त्याच्यासाठी सोडाची बॉटल असतेच.

3. नवीन मोबाईल घेतल्यावर त्यात सिम कार्ड टाकण्यापूर्वी त्याला ग्लास प्रोटेक्शन आणि कव्हर लावले जाते.

4. शाळेत मुले आणि मुली वेगळे बसणार.

5. तुमच्या रिलेशनशीप बद्दल तुमच्या कॉलनीतल्या सगळ्या मित्रांना माहित असेल पण कोणाच्याच आई-वडिलांना माहित नसेल.

6. ग्रुपमधल्या मित्राचे हॉटेल असेल तर त्याला बील द्यायये नाही.

7. दारू पिल्यावर इंग्रजीत बोलायचे, आणि मातृभाषेत शिव्या द्यायच्या.

8. हॉस्टेलमध्ये प्रायव्हसीची आशा ठेवू नये.

9. सकाळी उठण्यासाठी अलार्म नाही तर आईच्या भरोशावर बसायच.

10. कॉलेजमध्ये डब्बा न आणता कँटिनचे खायचे.

11. कोणतेही मोठे काम केल्यावर मित्रांना ट्रिट द्यावी लागते.

12. भाज्यांच्या गाड्यावर कोथिंबीर फुकट मिळते.

13. भारतातील सगळी मुले एकाच साइजचे कपडे घालुन मोठे झालेत.

14. ढेरी लठ्ठपणाची नाही तर खात्या पित्या घराची निशानी आहे.

15. घरात काही खायला बनवले तर सगळ्यासोबत शेअर करावे लागते.

हे आहेत काही नियम ज्यांना कोणत्याही पुस्तकात लिहीले नाहीये तरीपण सगळे यांचे पालन करतात.
some rare rules that's not in rule book but every Indian follows them

Post a Comment

 
Top