0
यामुळे सुनेने सासऱ्याला घरात येण्यास केला विरोध

इंदूर : येथील हरिजन भागात एका महिलेने दारू पिलेल्या मावस सासऱ्याला घरात येण्यास विरोध केला. यामुळे मावस सासरा नाराज होऊन घरी गेला आणि घडलेला प्रकार सांगितला. याबाबत त्याच्या मुलीला समजताच ती महिलेच्या घरी गेली आणि तिच्यावर अॅसिड फेकले. अॅसिडच्या या हल्ल्यात महिलेचा एक डोळा पूर्णपणे जळाला आहे. तर दुसऱ्या डोळ्यावर देखील याचा परिणाम झाला.


पोलिसांच्या मते, पीडिताने सांगितले की, आरोपी आणि त्यांचे घर जवळजवळ आहे. तिचा मावस सासरा दारू घरी येत होता. 24 डिसेंबर रोजी ती घरात एकटी असताना तो दारू पिऊन तेथे गेला. सासरा नशेत असल्यामुळे त्याला घरात येण्यास विरोध केला. पण त्याने घरी गेल्यावर माझ्यासोबत वाईट व्यवहार केला असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. यामुळे त्यांच्या घरातील लोकांनी पीडितेच्या विरोधात जाऊन तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पीडितेच्या पतीने आणि कुटुंबीयांनी सासऱ्याला समजवण्यासाठी घरी बोलावले पण त्याने तेथे गेल्यावर गोंधळ घातला. यानंतर मावस सासरा बलरामची 28 वर्षीय मुलगी प्रीती पीडितेच्या घरी आणि तिला पाणी मागितले. यादरम्यान आरोपीने पीडितेच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे.

अॅसिडच्या हल्ल्यात पीडितेच्या एका डोळ्याला झाली इजा

पीडितेवर अॅसिड हल्ला झाल्यानंतर तिला गोयल नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेचा एक डोळा निकामी झाला असून दुसऱ्या डोळ्यावर देखील अॅसिडचा परिणाम झाला आहे. घटनेच्या दोन दिवसांनतर तिळक नगर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे दोन दिवसांनंतर समोर आले प्रकरण

घटनेनंतर पीडिताला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबीयांच्या दबावामुळे रूग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना घटनेची माहिती दिली नाही. पण दोन दिवसांनंतर रूग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.girl acid attack on women in Indore

Post a Comment

 
Top