अहमदनगरमधील कोष्टीची घटना, महिला वेडसर असल्याचा पोलिसांचा दावा
काष्टीतील जुन्या बाजारतळाजवळ घोडनदीकाठी असलेल्या पंडित सोनार यांचा ३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. त्यामुळे लोक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, स्मशानभूमीकडे एक युवक प्रातर्विधीसाठी गेला असता त्याला उसाच्या शेतातून रडण्याचा आवाज आला. तरुणाने उसात जाऊन बघितले असता दोरीने हातपाय बांधलेल्या अवस्थेत मुलगा दिसला. त्याची सुटका करून गावात आणल्यानंतर तो सोनार यांचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सुटका करून आणणाऱ्या युवकालाच चोर समजून लोकांनी बदडून काढले. नंतर सत्य समजल्यावर त्याला सोडण्यात आले. दरम्यान, बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झाडू कामगार महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलीला एक महिला घोडनदीतून पळवून नेताना ग्रामस्थांनी पाहिले.
श्रीगोंदे- अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी येथे लहान मुलीला पळवून नेत असल्याच्या संशयावरून एका महिलेला नागरिकांनी खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तत्पूर्वी, एका मुलाचेही अपहरण झाले होते. मात्र, त्याला वाचवणाऱ्यालाच गावकऱ्यांनी चोप दिला.
काष्टीतील जुन्या बाजारतळाजवळ घोडनदीकाठी असलेल्या पंडित सोनार यांचा ३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. त्यामुळे लोक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, स्मशानभूमीकडे एक युवक प्रातर्विधीसाठी गेला असता त्याला उसाच्या शेतातून रडण्याचा आवाज आला. तरुणाने उसात जाऊन बघितले असता दोरीने हातपाय बांधलेल्या अवस्थेत मुलगा दिसला. त्याची सुटका करून गावात आणल्यानंतर तो सोनार यांचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सुटका करून आणणाऱ्या युवकालाच चोर समजून लोकांनी बदडून काढले. नंतर सत्य समजल्यावर त्याला सोडण्यात आले. दरम्यान, बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झाडू कामगार महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलीला एक महिला घोडनदीतून पळवून नेताना ग्रामस्थांनी पाहिले.
तरुणांनी उपसरपंचांना ही माहिती दिली. त्यांच्यासह ग्रामस्थांनी नदीपात्रात पाठलाग करून महिलेला पकडून गावात आणत एका खांबाला बांधून बेदम चोप दिला. नंतर श्रीगोंदे पोलिसांशी संपर्क करून मुले पळवणारी महिला म्हणून तिला ताब्यात देण्यात आले. दरम्यान, महिला श्रीगोंद्यातीलच असून ती वेडसर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment