0
तुकाराम मुंडे यांच्यासह राज्यातील चार आयएएस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे.

मुंबई- कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या एका महिन्यात मंत्रालयातून उचलबांगडी करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्तपदावरून मुंडे यांची 21 नोव्हेंबरला मंत्रालयात नियोजन आयोगाच्या सहसचिवपदी बदली करण्‍यात आली होती. या पदाचा कार्यभार स्विकारून मुंडे यांना एक महिना होत असतानाच त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आता मुंडे यांची एड्‍स नियंत्रण प्रकल्प संचालकपदी बदली करण्‍यात आली आहे.
दरम्यान, तुकाराम मुंडे यांच्यासह राज्यातील चार आयएएस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. रुबल अगरवाल यांच्याकडे पुणे महापालिका आयुक्त तसेच शिर्डी साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. शितल उगले यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच अतिरिक्त पदभार आणि विदर्भ वैधाणिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी तर बालाजी मंजुळे यांची पुणे अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.IAS Officer Tukaram Mundhes Again Transfer

Post a Comment

 
Top