0
अ‍ॅडिलेड : आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेल्या टीम इंडियाला आज गुरुवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीस सामोरे जायचे आहे. यजमान संघाला त्यांच्याच भूमीत लोळवून ७० वर्षांत पहिल्यांदा मालिका विजयाची संधी यानिमित्ताने चालून आली आहे.
द.आफ्रिकेत भारताला कसोटी मालिकेत १-३ ने आणि इंग्लंडमध्ये ०-४ ने पराभव पचवावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता आॅस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून, विदेशातील ‘फ्लॉप शो’चा कलंक पुसण्याच्या इराद्यात आहे. जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या कोहलीला ही मोठी संधी आहे.
आॅस्ट्रेलियात भारताने आतापर्यंत ४४ सामने खेळले असून, केवळ पाचच जिंकले. गेल्या ७० वर्षांतील ११ दौºयात भारताने दोनदा मालिका बरोबरीत सोडविली. सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वात १९८०-८१ आणि सौरव गांगुलीच्या नेतृत्वात २००३-०४ मध्ये मालिका बरोबरीत राहिली होती.
भारतीय संघाचा आक्रमक खेळण्याचा इरादा असून, १२ जणांमध्ये हनुमा विहारी आणि रोहित शर्मा यांचा समावेश राहील, असे संकेत मिळाले आहेत. २० बळी घेऊ शकणाºया पाच गोलंदाजांसह खेळण्याचे डावपेच आखण्यात आले. हार्दिक पांड्या जखमी असल्याने संघबांधणीत अडथळा येत आहे.
दुसरीकडे आॅस्ट्रेलियाला प्रतिबंधित स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची उणीव जाणवते. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा खेळेल.
भारताला सामना जिंकण्यासाठी फलंदाजीत कोहलीवर विसंबून राहण्याची वृत्ती सोडावी लागेल. दुसरा मुद्दा सलामी जोडीचा आहे. गेल्या आठ कसोटीत भारताने वेगवेगळ्या सलमी जोडी खेळविल्या. जोहान्सबर्ग कसोटीत पार्थिवने मुरली विजयसोबत डावाला सुरुवात केली होती. येथे पृथ्वी शॉ बाहेर झाल्यामुळे लोकेश राहुलसोबत मुरली विजय डावाचा प्रारंभ करू शकतो. गोलंदाजीची भिस्त ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांच्याकडे असेल. आॅस्ट्रेलिया संघात मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि नाथन लियोन यांचा समावेश असेल. 
>प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
आॅस्ट्रेलिया : टिम पेन (कर्णधार), मार्क्स हॅरिस, अ‍ॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, शॉन मार्श, पीटर हॅन्डस्कोम्ब, नाथन लियोन, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स,जोश हेजलवूड.The beginning of the campaign to win the test series at the adilet ground | आॅसीच्या मैदानात कसोटी मालिका विजय मिळविण्याच्या मोहिमेला सुरुवात

Post a Comment

 
Top