मुंबई - राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मराठा आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) मतदार यांच्यात मोठा संघर्ष उद््भवेल. तो या निवडणुकांत स्पष्ट दिसेल, असा अंदाज भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला आहे.
बाबासाहेबांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी प्रकाश आंबेडकर चैत्यभूमीवर पत्रकारांशी बोलत होते. अांबेडकर म्हणाले, मराठा जातीला एसईबीसी प्रवर्गातून शिक्षण आणि नाेकऱ्यांत आरक्षण दिल्यामुळे इतर मागासवर्ग भयभीत झाला आहे. आपले सर्वस्व गेले, अशी ओबीसींची भावना आहे. ओबीसींचा हा असंतोष आगामी निवडणुकीत स्पष्ट दिसेल. मराठा समाजाची आरक्षणासंबंधी भावना तीव्र होती. त्याचा लाभ उठवण्यात मुख्यमंत्री नक्की यशस्वी झालेत.

आरक्षणामुळे भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत १८० जागा मिळतील, असे मुख्यमंत्र्यांना वाटते आहे. मात्र, तसे अजिबातच होणार नाही. दादर रेल्वेस्टेशनला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. आज सकाळी त्यासंदर्भातले प्रतीकात्मक आंदोलनही दादर स्टेशनात झाले. त्यासंदर्भात विचारले असता दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी चुकीची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ऊठसूट नामांतराची मागणी करणे गैर आहे. मुंबईच्या स्टेशनांना एक इतिहास आहे. नामांतरामुळे तो इतिहास आपण पुसून टाकतो आहोत, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment