0
भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावाला. कसोटीचा दुसरा दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने चांगली केली. कर्णधार टिम पेन आणि कमिन्स यांनी सातव्या विकेटसाठी ५९ धावांची भागिदारी रचत ऑस्ट्रेलियाला ३०० धावांच्या पार नेले. पण,  १९ धावांवर असताना कमिन्सचा  त्रिफळा उडवत ही जमेलेली जोडी उमेश यादवने फोडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला जास्त वळवळ न करु देता भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव ३२६ धावात गुंडाळला. xपर्थ येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २७७ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिला दिवस संपला त्यावेळी आस्ट्रेलियाने आपले ६ फलंदाज गमावले होते. आज ऑस्ट्रेलिया आपल्या पहिल्या डावात किती धावा करणार याची उत्सुकता होती.

पेन-कमिन्स जोडीमुळे कांगारू ३०० च्या पार 

ऑस्ट्रेलियाचा कणर्धार टिम पेन आणि पॅट कमिन्स यांनी दुसऱ्या दिवशी सावध सुरुवात केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्या ३०० च्या पार नेली. कर्णधार टिम पेनने कमिन्सच्या साथीने एक भक्कम भागिदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ५९ धावांची भागिदारी रलची. कर्णधार टिम पेन चांगल्या टच मध्ये दिसत होता. तर त्याला पॅट कमिन्स एका बाजूने चांगली साथ देत होता. ही जोडी मोठी धाव संख्या उभारणार असे वाटत असताना उमेश यादवने कमिन्सचा त्रिफळा उडवला. या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाच्या राहिलेल्या फलंदाजांनी जास्त प्रतिकार न करता परतीची वाट धरली. कमिन्स बाद झाल्यावर ३८ धावांची खेळी करणारा कर्णधार पेनही बाद झाला. त्यानंतर इशांतने स्टार्क आणि हेजलवूडचा अडसर दूर करत कांगारुंचा पहिला डाव संपवला. भारताकडून इशांत शर्माने ४ तर बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारी यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.     

भारताची खराब सुरुवात; दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये 

ऑस्ट्रेलियाला ३२६ धावात रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावाची सुरुवात केली. पण, भारताची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने सलामीवीर मुरली विजयचा त्रिफळा उडवला. लंचसाठी फक्त एकच षटक राहिले असताना भारताने पहिली विकेट गमावल्याने चाहत्यांची निराशा झाली. लंचनंतर पुन्हा खेळ सुरु झालल्यावर भारताला दुसरा धक्का बसला. भारताचा दुसरा सलमीवीरही अवघ्या २ धावा करुन माघारी परतला. हेजलवूडने राहुलचा त्रिफळा उडवला. त्यामुळे ५ व्या षटकातच भारताची अवस्था २ बाद ८ धावा अशी झाली. राहुल बाद झाल्यावर आलेल्या विराटने आपल्या इनिंगची चौकाराने सुरुवात केली.  

विराट, चेतेश्वरने डाव सावरला 

भारताच्या ८ धावात दोन फलंदाज बाद झाल्यामुळे बॅकफूटला गेलेला भारतीय संघ विराटच्या पहिल्याच चेंडूवर मारलेल्या चौकाराने आश्वस्त झाला. विराटने सकारात्मक मानसिकतेने फलंदाजी करत टॉपवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलेले. विराटच्या जोडीला असलेल्या चेतेश्वर पुजाराने आपल्या सॉलिड डिफेन्सने कांगारुंचा जलदगती मारा रोखून धरला. दुसऱ्या बाजूने विराट    ने काही आकर्षक फटके मारत भारताचा धावफलक हालता ठेवला. या दोघांच्या आक्रमक आणि डिफेन्स या डेडली कॉम्बिनेशनमुळे चहापानापर्यंत भारताने ७० धावा केल्या. चहापानासाठी खेळ थांबला त्यावेळी विराट ३७ धावांवर तर पुजारा २३ धावांवर खेळत होते.

चहापानानंतर विराट आणि पुजाराची जमलेली जोडी स्टार्कने फोडली आणि भारताला तिसरा धक्का दिला. त्याने चेतेश्वर पुजाराला २४ धावांवर बाद केले. पुजारा बाद झाल्यावर आलेला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. रहाणेच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताची धावगती वाढली. दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

Post a comment

 
Top